IPL 2020 विशेष पॉडकास्ट : सुपरओव्हरमध्ये बाजी मारत आरसीबीची मुंबईवर मात

jalgaon-digital
3 Min Read

आबुधाबी । Abudhabi (वृत्तसंस्था)

आरसीबी आणि मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये सुपर ओव्हरचा सामनाही चांगलाच रंगला. या सुपर ओव्हरमध्ये आरसीबीने मुंबईवर बाजी मारलीे. मुंबईने सुपर ओव्हरमध्ये आरसीबीपुढे आठ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आरसीबीकडून कर्णधार विराट कोहली आणि एबी डीव्हिलियर्स उतरले होते.

सुपर ओव्हरमध्ये अखेरच्या चेंडूंवर आरसीबीला जिंकायला एका धावेची गरज होती. कोहलीने यावेळी चौकार लगावला आणि संघाला सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवून दिला.
सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करताना मुंबईला सात धावा करता आल्या. या सात धावा करताना मुबंईला किरॉन पोलार्डची विकेट गमवावी लागली.

त्यामुळे आरसीबीपुढे विजयासाठी आठ धावांची गरज होती. आरसीबीचा युवा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीने यावेळी भेदक गोलंदाजी करत मुंबईच्या संघाला फक्त सात धावा दिल्या आणि पोलार्डचा विकेटही मिळवला.

आरसीबी आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील आजचा सामना चांगलाच रंगतदार झाला. आरसीबीने देवदत्त पडीक्कल, आरोन फिंच आणि एबी डीव्हिलियर्स यांच्या अर्धशतकाच्या जोरावर मुंबईपुढे 202 धावांचे आव्हान ठेवले होते. पण या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईन्ही 201 धावा केल्या आणि सामान सुपर ओव्हरमध्ये गेला.

आरसीबीच्या 202 धावांचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात चांगली झाली नाही. मुंबईला सुरुवातीलाच रोहित शर्माच्या रुपात मोठा धक्का बसला. रोहितला यावेळी आठ धावाच करता आल्या. रोहितपाठोपाठ फॉर्मात आसलेला सूर्यकुमार यादवही शून्यावर बाद झाला. त्यानंतर सलामीवीर क्विंटन डीकॉकही 14 धावांबर बाद झाला आणि मुंबईचा संघा अडचणीत सापडला होता. त्यानंतर इशान किशनने अर्धशतक पूर्ण केले.

पण इशानपेक्षा जलदगतीने यावेळी किरॉन पोलार्डने धावा जमवल्या. पोलार्डने यावेळी 20 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक साजरे केले. तर इशान किशनने 99 धावांची धमाकेदार खेळी साकारली. अखेरच्या चेंडूवर पाच धावांची गरज असताना पोलार्डने चौकार लगावला आणि सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.

मुंबईने नाणेफेक जिंकून यावेळी आरसीबीच्या संघाला प्रथम फलंदाजी करणयासाठी आमंत्रित केले. पण त्यानंतर आरसीबीच्या दोन्ही सलामीवीरांनी दमदार फलंदाजी केल्याचे पाहायला मिळाले.

फिंच आणि देवदत्त यांनी यावेळी संघाला 81 धावांची सलामी दिली. फिंच बाद झाल्यावर देवदत्तने दमदार फलंदाजी करत संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. देवदत्तने मुंबईविरुद्ध 40 चेंडूंत 5 चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर 54 धावा केल्या. दोन्ही अर्धशतकवीर बाद झाल्यावर मैदानात एबी डीव्हिलियर्सचे वादळ आल्याचे पाहायला मिळाले.

डीव्हिलियर्सने यावेळी अखेरच्या षटकांमध्ये तुफानी फलंदाजी करत संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. डीव्हिलियर्सने यावेळी 24 चेंडूंत चार चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर नाबाद 55 धावा केल्या.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *