मविप्र प्रकरणाची दिल्लीच्या सीबीआय पथकाकडून चौकशी

गुन्ह्यांशी संबंधित संस्थेच्या कार्यालयाची तपासणी
मविप्र प्रकरणाची दिल्लीच्या सीबीआय पथकाकडून चौकशी

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

विधानसभेत गाजलेल्या (Legislative Assembly) पेन ड्राईव्ह बॉम्ब (Pen drive bomb) प्रकरणाचा तपास सीबीआयकडे (CBI)असल्याने दिल्ली येथील सीबीआयचे पथक जळगावात आले आहे. त्यांच्याकडून याप्रकरणाची कसून चौकशी (inquiry) करीत जबाब नोंदविले जात आहे. त्यामुळे अ‍ॅड. प्रवीण चव्हाण, अ‍ॅड. विजय पाटील यांच्यासह संबंधितांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

तत्कालीन विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री गिरीश महाजन यांना अडकविण्याचा कट पेन ड्राईव्ह बॉम्बच्या माध्यमातून उधळून लावण्यात आला होता. पेन ड्राईव्हमध्ये असलेल्या चित्रीकरणामध्ये तत्कालीन सरकारी वकील अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांनी त्यांच्या कार्यालयात कशा पद्धतीने कट रचल्याचे संपुर्ण चित्रीकरण त्यामध्ये होते.

तसेच मराठा विद्या प्रसारक संस्थेशी (Maratha Vidya Prasarak Sanstha) संबंधित निंभोरा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याशी संबंधित प्रकरणाचा संवाद देखील त्यामध्ये होता. या गुन्ह्याचा तपास सीबीआयकडे देण्यात आला होता. त्या अनुषंगाने दिल्ली येथील सीबीआयचे पथक शुक्रवारी रात्री जळगावात दाखल झाले. त्यांच्याकडून या गुन्ह्याशी संबंधित असलेल्यांची आणि मविप्रच्या संचालकांची चौकशी केली जात आहे.

.

संशयित नॉटरिचेबल

सीबीआयचे पथक सुमारे आठवडा भर जळगावात तळ ठोकून असल्याने त्यांच्याकडून या गुन्ह्याशी संबंधित असलेल्यांची चौकशी केली जात आहे. तसेच सीबीआयचे पथक जळगावात असल्याचे कुणकुण लागताच यातील काही संशयितांनी जळगावातून बाहेरगावी निघून गेले असल्याने ते नॉट रिचेबल असल्याची माहिती सूत्रांनी दिली

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com