
नागपूर | प्रतिनिधी Nashik
नाशिक जिल्ह्यातील अंबड पोलिस ठाण्याचे ( Ambad Police Station )पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख ( Police Inspector Bhagirath Deshmukh)यांच्याविरुद्ध आलेल्या तक्रारींची दखल घेऊन त्यांची अतिरिक्त पोलिस महासंचालक यांच्यामार्फत एका महिन्याच्या आत चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल आणि तेथे मुदत संपूनही कार्यरत असलेल्या पोलीस नाईक प्रशांत नागरे यांची बदली करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis )यांनी बुधवारी विधानसभेत केली.
भाजपचे आमदार नितेश राणे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, यासंदर्भात सदस्यांनी सभागृहात व्यक्त केलेल्या भावना विचारात घेऊन त्यांनी केलेल्या तक्रारींची दखल घेण्यात आली आहे. एका महिन्यात याबाबत चौकशी करून कार्यवाही करण्यात येईल.