Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याExclusive Interview : जागतिक अजिंक्यवीर ठरल्याचा अभिमान - विदित गुजराती

Exclusive Interview : जागतिक अजिंक्यवीर ठरल्याचा अभिमान – विदित गुजराती

करोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर जागतिक ऑलिम्पियाड बुद्धीबळ स्पर्धा या वर्षी ऑनलाईन झाली. या स्पर्धेत रशिया सोबत संयुक्त विजेतेपद पटकावत भारताने एतिहासिक कामगिरी केली. ही कामगिरी करणार्‍या संघांचा संघ नायक नाशिकचा विदित गुजराथी होता. या विजयाबाबत ‘देशदूत’च्या ‘अ‍ॅचिवर्स’ या सदरामध्ये विदितने स्पर्धेतील अनुभव मनसोक्त गप्पांमधून कथन केले.

संवाद : खंडू जगताप, क्रीडा प्रतिनिधी, नाशिक

- Advertisement -

जागतिक अजिंक्यपदाचे विजेते म्हणुन तुझा आणि संपुर्ण टिमचा अनुभव कसा आहे.?

आपण जागतिक विजेते ठरलोत यावर अद्यापही विश्वास बसत नाही. देशाच्या विविध भागातील 12 लोकांनी एकोपा साधत हे विजेतेपद साकार केले आहे. 163 देशांमधून विश्वविजेता होणे ही सोपी गोष्ट नाही. भारताची 7 वी फिड होतो. यामधून एकएक विजय मिळवत आपण विजेतेपदापर्यंत पोहचलो. भारतीय बुद्धीबळाने खुप मोठी प्रगती केली आहे असे अभिमानाने म्हणावे लागेल.

जागतिक ऑलिम्पियाड बुद्धीबळ स्पर्धा प्रथमच ऑनलाईन झाली यात प्रत्येक खेळाडूचा अनुभव कसा होता.

करोना विषाणुचा प्रसार जगभर असल्याने यंदाची जागतिक ऑलिम्पियाड बुद्धीबळ स्पर्धा ऑनलाईन झाली. कप्तान म्हणुन मी मोठी जाबाबदारी माझ्यावर होती. केवळ खेळ नाही तर सर्वांचा समन्वय, तांत्रिक अडचणी, प्रत्येक गेमनंतर सर्वांशी चर्चा व पुढील नियोजन असे यातून सर्वाची जबाबदारी काय असते याचा वेगळा अभुव मला मिळाला.

यामध्ये तांत्रिक अडचणी आल्या. इंटरनेट ही आमच्या हातातील बाब नव्हती, ऐनवेळी विश्वनाथ आनंद, हम्पी यांच्या घरचे नेट बंद झाले होते. इतर तांंत्रिक अडचणी होत्याच याच्या परिणामी अंतिम फेरीत रसियाने आघाडी घेतली होती. मात्र ही बाब निदर्शनास आनल्यानंतर भारताला संयुक्त विजेता घोषीत करण्यात आले.

या स्पर्धेतील आव्हानात्मक क्षण कोणते होते.

या स्पर्धेत 163 देशांच्या संघांचा सामावेश होता. भारताला 7 वे फिडे होते. प्रारंभीच्या गट सामन्यात चांगली कामगिरी झाली. यातील शेवटच्या सामन्यात ऑलिम्पियाडचा विजेता चीनचा संघ होता. यामुळे खूप दबाव होता. यामध्ये ज्युनीअरर्सने चारही सेट जिंकेले. यामुळेच आपला संघ पुढे जाऊ शकला. पोलंड विरूद्धच्या उपांत्य सामन्यात पहिला सेट आम्ही हरलो होतो. यामुळे पुन्हा खेळात येणे सोपे नव्हते परंतु यानंतर चांगली प्रगती करत हम्पीने टायब्रेकमध्ये विजय मिळवून दिला. रसिया साेंंबत सर्वांनी चांगली लढत दिल्या सहाच्या सहा सेट बरोबरीत सुटले. परंतु आंनद, हम्पी तसेच इतरांनाही तांत्रिक अडचणी आल्या. रसियाला विजय घोषीत करण्यात आले होते. परंतु तांत्रिक अडचणी लक्षात आणुन दिल्यानंतर आपणास संयुक्त विजेता घोषीत करण्यात आले. हे सर्व क्षण कसोटीचे होते. तसेच बरेच काही शिकवणारेही.

तुझा बुद्धीबळासाठीचा लहान पनापासूनचा ध्यास ते आताचे जागतिक विजेतेपद याबाबत काय सांगशील?

हरणे ही गोष्टी मला लहानपणापासून आवडलेली नाही. वयाच्या सातव्या वर्षापासून मी बुद्धीबळ खेळत आहे. राज्य स्तरावर विजय मिळवल्यानंतर राष्ट्रीय स्पर्धेसाठी अती उत्सहात गेलो होतो. तेथे चुकांमुळे पराभव पत्करावा लागला. यामुळे खूप नाराज झालो. घरी गॅलरीमध्ये पुढील स्पर्धांची नावे लिहुन यामध्ये विजय होत ग्रँडमास्टरपद आणि विश्वविजेतेपद मिळवणार असे लिहले होते. आणि पुढे संयमाने खेळत प्रत्येक स्पर्धेत विजेतेपद पटकावत गेलो. आणि भिंतीवर लिहलेले खोडत गेलो. हा विजय त्याचेच प्रतिक आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या