Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याशिर्डीत साकारणार आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल, अम्युझमेंट पार्क

शिर्डीत साकारणार आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल, अम्युझमेंट पार्क

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या ताब्यातील विनावापर जमिनी विविध सार्वजनिक प्रयोजनासाठी जमिनी हस्तांतरीत करुन त्याठिकाणी भविष्यात लोकहिताचे प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. त्यानुसार शिर्डी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य क्रीडा संकुल आणि इतर भाविकांच्या सोयी सुविधांसह अम्युझमेंट पार्क/लेझर तथा फाऊंटन शो/गार्डनची उभारणी करणे, प्रधानमंत्री आवास योजनेसाठी वापर करणे आदी योजनांसाठी जागेचा वापर होणार आहे.

- Advertisement -

शेती महामंडळाच्या ताब्यातील सुमारे ४७ हेक्टर क्षेत्र असलेल्या जमिनी शिर्डी, साकुरी, निमगाव, कोऱ्हाळे, शिरसगाव या गावात उपलब्ध असून तसेच त्या विनावापर आहेत. या जागा लोकहिताच्या योजनांसाठी वापरल्या जाव्याय म्हणून यासाठी आवश्यक असलेला जागा हस्तांतरण करण्याचा ठराव आज मंत्रिमंडळ बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आल्याची माहिती राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ‘सार्वमत’शी बोलताना दिली.

श्री साईबाबा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या साईभूमी शिर्डी आणि आसपासचा परिसरात असलेल्या शेती महामंडळाच्या जागांचा जनहितार्थ वापर व्हावा या स्थनिकांच्या मागणीचा आणि भविष्यातील नियोजनाचा धोरणात्मक विचार करून विखे पाटील यांनी सदर प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर केला.

आंतरराष्ट्रीय दर्जाचे धार्मिकस्थळ तसेच सर्वधर्म समभावाचे प्रतीक असलेल्या शिर्डी आणि परिसरात भविष्यकालीन दृष्टीने उत्तम सोयीसुविधा उपलब्ध करण्याचा मानस राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

बाजार समिती, ग्रामपंचायत साकुरी, नगरपरिषद राहाता, ग्रामपंचायत निमगाव कोऱ्हाळे, ग्रामपंचायत बेलापूर वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी, मध्यवर्ती प्रशासकीय संकुल तसेच विविध शासकीय कार्यलय, अधिकारी-कर्मचारी यांच्या निवासस्थानासाठी शेती महामंडळाच्या जागेचा सुयोग्य आणि सुनियोजित वापर करण्यासातबी सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याचे विखे-पाटील यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या