ओझर विमानतळावरुन लवकरच आंतरराष्ट्रीय विमानसेवा

ब्युरो ऑफ इमिग्रेशनच्या परवानगीनंतर फलक
ओझर विमानतळावरुन लवकरच आंतरराष्ट्रीय विमानसेवा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

ब्युरो ऑफ इमिग्रेशनच्या परवानगीनंतर (After permission from the Bureau of Immigration )ओझर विमानतळावर ‘नाशिक आंतरराष्ट्रीय विमानतळ’ (Nashik International Airport )असा फलक झळकला आहे. ब्युरो अधिकार्‍यांच्या दोन भेटींनंतर त्यांनी सूचवलेल्या त्रूटींच्या पूर्ततेनुसार लगेच तपासणी यंत्रणांसह कस्टमच्या सुविधांची उभारणींची पूर्तता झाली आहे. ब्युरो अधिकार्‍यांच्या अंतिम पाहणीनंतर खर्‍या अर्थाने आंतराष्ट्रीय विमानसेवा सुरू होणार असल्याने नाशिककर समाधान व्यक्त करीत आहेत.

नाशिकला आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होण्यासाठी उद्योजक, लोकप्रतिनिधी व एचएएल यांचे संयुक्त प्रयत्न सुरू होते. ब्युरो ऑफ इमिग्रेशनने दोन पहाणी दौरे केले. त्यांनी दर्शवलेल्या त्रूटींची पूर्तता केल्यानंतर नाशिक विमानतळावर नाशिक आंतरराष्ट्रीय विमानतळ असा फलक लिहिण्यास परवानगी मिळालेली आहे. लवकरच ब्युरो ऑफ इमिग्रेशनच्या अंतिम पाहणी केल्यानंतर आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर शिक्कामोर्तब होणार असल्याने त्यासाठी सर्वच यंत्रणा झटून कामाला लागल्याचे चित्र आहे. त्यांच्या होकारानंतर नाशिकला आंतरराष्ट्रीय विमानांचे टेकऑफ आणि लँडिंगची सुरुवात केली जाईल.

सध्या नाशिक विमानतळावरुन देशांतर्गत अहमदाबाद, बेळगाव, दिल्ली, पुणे या चार शहरांकरीता विमानसेवा सुरू आहेत. नजीकच्या काळात गोवा, हैदराबाद, बंगळुरू या शहरांच्या सेवा सुरू करण्याचे नियोजन झालेले आहे. त्यासाठीच्या आगमन, प्रस्थान, सुरक्षा तपासणी या सुविधा उपलब्ध आहेत.

या विमानळाची सर्वात मुख्य सकारात्मक बाब म्हणजे एचएएलची 3 हजार मीटरची लांबलचक धावपट्टी होय. त्यासोबतच आंतरराष्ट्रीय विमानसेवेला लागणार्‍या इतर सेवा सुविधाबाबत ब्युरोच्या पदाधिकार्‍यांनी दोन वेळा विमानतळाची पहाणी करुन सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने चाचपणी केली होती. त्यांनी दिलेल्या सूचनांनुसार त्यात बदलही करण्यात आले आहेत. आता अंतिमत: ब्युरोच्या पदाधिकार्‍यांची पहाणी होईल व त्यानंतर या विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा प्राप्त होणार आहे.

आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होण्यामुळे नाशिकच्या उद्योग, व्यापार व पर्यटन हॉटेल क्षेत्राच्या विकासाला खर्‍या अर्थाने गती मिळणार आहे. या सोबतच मुंबई विमानतळावरील गर्दी कमी करण्यासाठी जवळचे पर्यायीे विमानतळ म्हणून उपलब्ध होऊ शकणार आहे. नाशिक परिसरातून हजयात्रेला मोठ्या संख्येने मुस्लीम बांधव जात असतात. त्यात प्रामुख्याने नाशिक, मालेगाव, मनमाड, नगर, संगमनेर, औरंगाबाद, भिवंडी आदी भागातून जाणार्‍या नागरिकांची मोठी संख्या राहत असते. त्यांना नाशिकहून थेट विमानसेवा उपलब्ध होऊ शकणार आहे.

एमआरओला प्रारंभ

विमानांच्या देखभाल दुरुस्ती व सर्व्हिसिंग प्रणाली नाशिक विमानतळावर उभारण्यात आलेली आहे. याठिकाणी छोट्या विमानासह दोन हेलिकॅाप्टर दाखल झालेले आहेत. भविष्यात मोठ्या विमानांची मालिका दाखल होऊ शकणार असल्याने ‘एमआरओ’ पाठोपाठ नाईट लॅण्डिंगची सुविधा देखील गतिमान होण्यास मदत होणार आहे.

Related Stories

No stories found.