Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यासेवा पुस्तकांसाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश

सेवा पुस्तकांसाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश

नाशिक । प्रतिनिधी Nashik

राज्यातील समाज कल्याण विभागातील ( Department of Social Welfare )अधिकारी, कर्मचारी यांचे मासिक वेतन त्याच महिन्याच्या 31 तारखेस किंवा पुढील महिन्याच्या 1 तारखेस अदा होईल,याची सर्व कार्यालयांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे ( Social Welfare Commissioner Dr. Prashant Naranware ) यांनी यांनी दिले.

- Advertisement -

याबाबतचे परिपत्रक त्यांनी निर्गमित केले आहे. विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना देय असलेले मासिक वेतनाच्या अनुषंगाने उपाययोजना करण्याचे देखील सूचित केले आहे.याबाबत दिरंगाई झाल्यास संबंधित जबाबदार अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याचा इशाराही देखील देण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे विभागात कार्यरत असलेले सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांची मूळ सेवा पुस्तके सर्व नोंदीसह अद्यावत करणेबाबत ही आयुक्तालयाने निर्देश दिलेले असून त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचार्‍यास सेवानिवृत्तीनंतर अनुज्ञेय असलेले सेवा निवृत्ती विषयक लाभ जलद गतीने मिळू शकतील.

याबाबत देखील आयुक्तालयाने परिपत्रक निर्गमित केले असून सर्व कार्यालय प्रमुखांना कर्मचार्‍यांची सेवा पुस्तके खास मोहीम राबवून सर्व नोंदीसह अद्यावत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.याबाबत आयुक्त स्वतः क्षेत्रीय कार्यालयांना भेटी देऊन सद्यस्थिती जाणून घेणार आहेत. याबाबत देखील नोंदी अपूर्ण राहिल्यास किंवा काम पूर्ण न झाल्यास त्याची देखील जबाबदारी निश्चित करण्यात येऊन कारवाई करण्याचे देखील परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

समाज कल्याण विभागाने यापूर्वी देखील अधिकारी व कर्मचार्‍यासाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत, तसेच विविध प्रशिक्षण देण्यात येत आहेत, त्याच प्रमाणे प्रशासकीय गतिमानता निर्माण करण्याचा प्रयत्न विभागाकडून करण्यात येत आहे. कर्मचारी हिताचे निर्णय होत असल्याने कर्मचारी वर्गाकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या