तब्बल 7 तासांनी पुन्हा सुरू झालं WhatsApp, Facebook

तब्बल 7 तासांनी पुन्हा सुरू झालं WhatsApp, Facebook

दिल्ली | Delhi

प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफाॅर्म असलेले फेसबुकसह त्याच्याशी संलग्न असलेल्या मेसेंजर आणि व्हाॅटसअप, इन्स्टाग्रामसह सेवा जगभरात ठप्प झाली आहे. सोमवारी सुमारे 9 वाजून 15 मिनिटांनी तिन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म डाउन झाले होते. हे 3 प्लॅटफॉर्म तब्बल 7 तास डाउन राहिल्यानं जगभरातील वापरकर्त्यांना याचा फटका बसला. डाउन राहिल्यानं फेसबुकच्या शेअरमध्ये तब्बल 5 टक्क्यांची घसरण झाली. मात्र, इतके तास व्हॉट्सऍप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम डाउन का होतं, हे अद्याप समजलेलं नाही.

सोमवारी रात्री Whatsapp, Facebook आणि अनेक सोशल मीडिया साइट्स बंद पडल्या. मात्र याच नेमके कारण काय आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही.

याबाबत व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकने आपल्या वेबसाईटवर मॅसेज लिहीत दिलगिरी व्यक्त केली आहे. “माफ करा, काहीतरी चुकीचं झालं आहे. आम्ही गुंता सोडवण्याचं काम करत आहोत. लवकरच सर्व काही सुरळीत होईल”, असं फेसबुकनं आपल्या मॅसेजमध्ये लिहीलं आहे.

सोशल मीडिया ही गोष्ट आता प्रत्येकासाठीच अत्यावश्यक झाली असून, हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बंद असल्याने अनेकजण हैराण झाले होते. त्यानंतर आता ट्विटर व्हाट्सअपआणि फेसबूक डाऊनचा हॅशटॅग ट्रेंड झाले आहे. त्यानंतर अनेकांनी आपलं फेसबूक, व्हाट्सअप बंद झाल्याने वेगवेळे प्रयोग करून सुरू करण्याचा प्रयत्न केले.

Related Stories

No stories found.