नाशिक | प्रतिनिधी
मॉडेलिंगसाठी इंस्टाग्रामवर फोटो प्रसारीत करणे एका महिलेसाठी महागात पडले आहे. एकाने त्या फोटोत फेरबदल करून ते बनावट इंस्टग्राम वरून बदनामी कारक मजकूर प्रसारीत केल्याचा प्रकार घडला आहे.
पिडीतेने दिलेल्या तक्रारीनुसार तीने तीचे फोटो मॉडेलिंगसाठी इंस्टाग्रामवर प्रसारीत केले होते. अज्ञात दोन संशयितांनी हे फोटो घेऊन त्यामध्ये विकृत बदल करून ते दुसर्या बनावट इंस्टाग्राम खात्यावर प्रसारीत केले.
तसेच पिडीतेबाबत बदणामी कारक मजकूर प्रसारीत केला. याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कर्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरिक्षक देवराज बोरसे करत आहेत.