या हॅकरमुळे बंद पडले WhatsApp, Facebook अन् Instagram

या हॅकरमुळे बंद पडले WhatsApp, Facebook अन् Instagram

WhatsApp, Facebook आणि Instagram कडून सुमारे ७ तासांपेक्षा अधिक तासांच्या प्रतिक्षेनंतर मंगळवार (5 ऑक्टोबर) च्या सकाळी सेवा पूर्ववत करण्यात आली आहे. जगभरात काल रात्री फेसबूक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅप ठप्प झाल्याने युजर्सनी संताप व्यक्त केला होता.

WhatsApp, Facebook आणि Instagram अप्लिकेशन्स बंद होण्यामागे अनेक कारणं सांगितली जात आहेत. पण आता यामध्ये एक धक्कादायक कारण समोर आलं आहे. 'थॉमस' मुळे संपूर्ण जगाला आणि कंपनीला या आउटेजचा सामना करावा लागला आहे.

या हॅकरमुळे बंद पडले WhatsApp, Facebook अन् Instagram
पाच वर्षीय चिमुकल्याच्या मृतदेहावर गुलाल, कुंकू : नरबळीचा संशय

कोण आहे थॉमस?

थॉमस हा अमेरिकेतील एक मोठा हॅकर (Hacker) आहे. त्यानं या आधी अनेकमोठमोठ्या सिस्टम हॅक केल्या आहेत. त्याच्या नावावर अनेक सायबर गुन्हे आहेत. अमेरिकन गुप्तचर यंत्रणा FBI नं ही माहिती दिली आहे. आता या हॅकरला पकडण्याची जबाबदारी एफबीआयवर दिली आहे. एफबीआयचे साइबर क्राइम अधिकारी जॉन मँकक्लेन यांना थॉमस पकडण्याची जबाबदारी दिली आहे.

मार्क झुकेरबर्गला मोठे नुकसान

WhatsApp, Facebook आणि Instagram सेवा ठप्प झाल्याचा मोठा फटका मार्क झुकेरबर्ग (Mark Zuckerberg) याला बसला असून या सहा तासात त्याची संपत्ती ६०० कोटी डॉलर्स म्हणजे जवळपास ४५ हजार ५५५ कोटी रुपयांनी कमी झाली आहे. एका रिपोर्ट नुसार मार्कचे जागतिक श्रीमंत यादीतील स्थान एक नंबरने घसरून तो आता बिल गेट्स यांच्या खालच्या नंबरवर गेला आहे.

भारतातील सरकारी आकडेवारीनुसार Facebook चे ४१ कोटी, WhatsApp चे ५३ कोटी तर Instagram चे २० कोटी युजर्स आहेत. फेसबुकचा विचार केला तर हा आतापर्यंतचा सर्वात मोठा सर्व्हर स्लोडाऊन होता. 2019 सालीही फेसबुकला अशा स्थितीचा सामना करावा लागला होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com