Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यापुरातत्व विभागाची त्र्यंबकेश्वर मंदिरात पाहणी

पुरातत्व विभागाची त्र्यंबकेश्वर मंदिरात पाहणी

त्र्यंबकेश्वर | मोहन देवरे Trimbakeshwar

केंद्रीय पुरातत्त्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी (औरंगाबाद) येथे भेट देऊन पाहणी केली. त्रंबकेश्वर मंदिरातील पिंडीची झिज होत झाल्याचे वृत्त प्रसारित झाले. सोमवारी नाशिकच्या पुरातत्व अधिकाऱ्यांनी अहवाल दिल्यानंतर मंगळवारी आज औरंगाबादच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पिंडीची पाहणी केली. आता लवकरच पिंडीवर वज्रलेप होणार आहे.पिंडीवर लवकरच वज्र लेप होणार हे ‘देशदूत’ चे वृत्त आता खरे ठरणार आहे.

- Advertisement -

भारतीय पुरातत्त्व खाते औरंगाबाद विभागाचे मिलन चावला यांनी त्रंबकेश्वर मंदिराच्या गर्भगृहात जाऊन पाहणी केली.देवस्थानचे अध्यक्ष न्यायाधीश विकास कुलकर्णी त्यांचे समावेत होते. कुलकर्णी यांनी आतील पिंडीची माहिती यावेळी त्यांना दिली गर्भगृहात सोहळ्यात जाऊन ही पाहणी करण्यात आले.

त्रंबकेश्वर मंदिरातील महादेवाच्या पिंडीचे मूळ स्वरूप तसेच राहील व दर्जेदार पद्धतीने वज्रलेप होईल याची दक्षता घेणार असल्याचे चावला यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.पुरातत्त्वचे दानवे ,चौधरी, मिश्रा व इंजिनियर तसेच ट्रस्ट विश्वसत दिलीप तुंगार, सत्यप्रिय शुक्ल, अधिकारी समीर वैद्य सहकारी माचेवें ट्रस्टचे तांत्रिक सल्लागार मिलिंद तारे यावेळी उपस्थित होते.

त्रंबकेश्वर मंदिरातील नंदिकेश्वर महादेवाच्या मंदिरात दर्शनी भागाच्या जाळ्या तुटलेले आहे त्या कडे वेधण्यात आले . वज्रलेप कामाला सुरुवात होई पावतो. तो पर्यंत पिंडीची जास्तीत जास्त दक्षता घेण्यात येणार आहे. वज्रलेप कामाची तारीख जाहीर झाल्यानंतर त्रंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट या संदर्भात पूर्व सूचना जनतेला भाविकांना देणार आहे.

दिवाळी सुट्ट्यांमध्ये त्रंबकेश्वरला मोठी गर्दी असते . त्यामुळे 15 ऑक्टोबर पूर्वी मंदिर अंतर्गत पुरातत्वची सर्व कामे पूर्ण झालेली दिसतील.

- Advertisment -

ताज्या बातम्या