Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याठक्कर डोम कोविड सेंटरची आयुक्तांकडून पाहणी

ठक्कर डोम कोविड सेंटरची आयुक्तांकडून पाहणी

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक महानगर पालिकेच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना केल्या जात असताना महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह व ठक्कर डोम येथे पाहणी करून विविध प्रकारची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी दिल्या.

- Advertisement -

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह मेरी कोविड सेंटर येथे सध्या राहत असलेल्या विद्यार्थ्यांना एका स्वतंत्र इमारतीत स्थलांतरित करून उर्वरित इमारतीत करोना रुग्णांना ठेवण्याची व्यवस्था करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना आयुक्त कैलास जाधव यांनी दिल्या.

तसेच ठक्कर डोम येथे पाहणी करून येथील कक्ष सुरू करण्याच्या दृष्टीने पूर्वीप्रमाणेच अद्यावत अशी व्यवस्था करण्याच्या सूचना यावेळी आयुक्त कैलास जाधव यांनी संबंधित विभागास दिल्या. यावेळी विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे, विवेक धांडे, कार्यकारी अभियंता राजू आहेर,करोना कक्ष अधिकारी डॉ.आवेश पलोड, क्रेडाईचे अभिषेक ठक्कर,बागड आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या