Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यामनपा आयुक्तांकडून मिरवणूक मार्गाची पाहणी

मनपा आयुक्तांकडून मिरवणूक मार्गाची पाहणी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

तब्बल दोन वर्षानंतर नाशिक शहरातून गणेश विसर्जन मिरवणूक (Ganesh immersion procession) निघणार आहे. यामुळे कोणत्याही प्रकारे भाविकांना त्रास होणार नाही याची पुरेपूर काळजी महापालिका प्रशासन ( NMC Administration ) घेत आहे.

- Advertisement -

दरम्यान, महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार ( NMC Commissioner Dr. Chandrakant Pulkundvar )यांनी महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी तसेच स्मार्ट सिटीच्या अधिकार्‍यांसोबत चार किलोमीटर पायी चालत मिरवणूक मार्गाची पाहणी केली. मिरवणूक मार्गावरील सर्व प्रकारचे अडथळे त्वरित दूर करण्याचे तसेच स्मार्ट सिटीची उर्वरीत कामे त्वरित पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले.

महानगरपालिकेने शहरातील विसर्जन स्थळे आणि मिरवणूक मार्गावर प्राधान्याने लक्ष केंद्रित केले आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. पुलकुंडवार आज सकाळी 7 वाजेपासून शहरातील मुख्य गणेश विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी करण्यासाठी आले होते. चौक मंडई येथील वाकडी बारव म्हणजेच सारडा सर्कल ते गौरी पटांगण दरम्यान त्यांनी चार किलोमीटर मार्गाची पाहणी केली. नाशिक रोड येथील बिटको पॉईंट ते दसक घाट पर्यंतच्या मार्गाचीही आयुक्तांनी पाहणी केली. मिरवणुकीला अडथळा येणार नाही याची, काळजी सर्व विभागांनी घ्यावी, असे आदेश दिले.

मिरवणूक मार्गावरील खड्डे, वाहनांचे अतिक्रमण, मार्गावरील स्वच्छता, विद्युत तारा आदी कामांचा आढावा त्यांनी महापालिकेच्या अधिकार्‍यांकडून घेतला तसेच विविध सूचनाही केल्या. मिरवणूक मार्ग डांबरीकरणाचे काम आणि चेंबर दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. मिरवणूक मार्गावरील विविध कामे मार्गी लागली आहे. मात्र, स्मार्ट सिटीची कामे न झाल्याने ती कामे त्वरीत पूर्ण करण्याचे आदेश दिले.बांधकाम, मलनिस्सारण व पाणीपुरवठा, विद्युत, अतिक्रमण, घनकचरा या विभागाच्या प्रमुखांशी चर्चा करुन कामांचा आढावा घेतला.

उपायुक्त करुणा डहाळे, अधीक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके, उदय धर्माधिकारी, शहर अभियंता शिवकुमार वंजारी, कार्यकारी अभियंता सचिन जाधव, संदेश शिंदे, जितेंद्र पाटोळे, रविंद्र धारणकर, स्मार्ट सिटीचे सीईओ सुमंत मोरे, जनरल मॅनेजर दिग्विजय पाटील, प्रोजेक्ट मॅनेजर महेश जगताप, विशाल भोसले, एन. एस. पाटील, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड, नितीन धामणे, पूर्व विभागीय अधिकारी नितीन नेर, पश्चिम विभागीय अधिकारी मदन हरीश्चंद्र, पंचवटी विभागीय अधिकारी कैलास राबडिया आणि या विभागांचे स्वच्छता निरीक्षक यावेळी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या