पंचवटी विकासकामांची आयुक्तांकडून पाहणी; केल्या 'या' सूचना

पंचवटी विकासकामांची आयुक्तांकडून पाहणी; केल्या 'या' सूचना

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (Municipal Commissioner and Administrator Dr. Chandrakant Pulkundwar) यांनी पंचवटी विभागात (panchavati division) मनपातर्फे सुरु असलेल्या विविध विकासकामांची पाहणी (development works) केली.

या दौर्‍यात मनपा आयुक्तांनी हिरावाडी येथील 660 आसन क्षमतेच्या नाट्यगृहाचीर पहाणी केली. तसेच आडगाव येथे नव्याने उभारण्यात आलेले कबड्डी स्टेडीयम (Kabaddi Stadium), स्मार्ट सिटीमार्फत (Smart City) सुरु असलेली मनपाच्या भांडारातील पाण्याची टाकीचे बांधकाम (Construction of water tank), इंद्रकुंडाजवळील पंडीत पलुस्कर सांस्कृतिक भवनांच्या कामांची पाहणी केली. या पाहणी दौर्‍यात मनपा आयुक्तांनी सूरू असलेल्या विकास कामातील तांत्रिक बाबींची सविस्तर माहीती जाणून घेतली.

सूरु असलेली सर्व कामे निर्धारित मुदतीमध्ये पूर्ण करताना गुणवत्तेची तडजोड न करण्याची तंबी अधिकारी व ठेकेदारांला दिली. सदर कामे लवकर पूर्ण करुन त्यांचे लोकार्पण करण्यात यावे. जेणेकरुन सामान्य नागरिकांना त्यांचा लाभ होऊन सदर प्रकल्पांचा वापर सुरु होईल, असे आयुक्तांनी यावेळी सांगितले.

या पाहणी दौर्‍यात आयुक्तांबरोबर शहर अभियंता शिवकुमार वंजारी, पंचवटी पाणीपुरवठा विभागातील उपअभियंता प्रकाश निकम, वास्तुविशारद धिरज पाटील तसेच स्मार्ट सिटीचे महाव्यवस्थापक दिग्विजय पाटील, स्मार्ट सिटी सल्लागार गिरीजा सारंगधर आणि संबंधित कामाचे मक्तेदार उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com