राज्यभरातील ऑक्सिजन प्रकल्पांची तपासणी

राज्यभरातील ऑक्सिजन प्रकल्पांची तपासणी

नाशिक। प्रतिनिधी

डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टँकच्या लिकेजमुळे घडलेली घटना अतिशय दुःखद व मन हेलावणारी आहे. या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी राज्यातील इतर सर्व रूग्णालयांच्या ऑक्सिजन प्रकल्पांची तपासणी करण्यात येऊन, तांत्रिक बाबींची पडताळणी करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.

नाशिक महापालिकेच्या डॉ. जाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सीजन गळतीच्या घटनास्थळी कृषीमंत्री भुसे यांनी भेट देवून पाहणी केली. यावेळी कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी रुग्णालयाची पाहणी केली.

यानंतर महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव यांच्याशी चर्चा करून घटनेची सविस्तर माहिती घेतली. रुग्णालयातील इतर रुग्णांना चांगले उपचार मिळतील यासाठी यंत्रणा शर्थीचे प्रयत्न करीत असून आता ऑक्सिजन गळती पूर्णतःथांबली असल्याने परिस्थिती नियंत्रणात असल्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी यावेळी सांगितले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com