ब्रह्मगिरीच्या उत्खनन झालेल्या भागाची पाहणी

आ. खोसकर, महसूल विभागाचा दौरा
ब्रह्मगिरीच्या उत्खनन झालेल्या भागाची पाहणी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

ब्रह्मगिरी डोंगराला ( Brahmagiri mountain ) उत्खननावेळी ब्लास्टिंग अथवा इतर स्फोटांमुळे पडलेल्या भेगा रासायनिक प्रक्रिया (ग्राऊंटिंग) करून भरता येणे शक्य आहे. त्यामुळे डोंगराच्या कोसळण्याच्या अवस्थेत असलेल्या दरडी मजबूत होऊन परिसर धोक्याच्या बाहेर राहू शकतो, असे मत भूगर्भतज्ज्ञांनी ( geologists )पाहणी दौर्‍यात व्यक्त केले.

येथे प्रदक्षिणा मार्गातील उत्खनन झालेल्या बाधित धोकादायक भागाची पाहणी करण्यासाठी आ. हिरामण खोसकर ( MLA Hiraman Khoskar ) यांच्यासह महसूल विभाग ( Revenue Department ) आणि ब्रह्मगिरी बचाव कृती समितीच्या पदाधिकार्‍यांनी दौरा केला. त्यावेळी चर्चा करण्यात आली.

यावेळी दरड कोसळून दुर्घटना घडू नये यासाठी करण्यात येणार्‍या उपायांची चर्चा करण्यात आली. त्यावेळी ब्रह्मगिरी बचाव समिती, ब्रह्मगिरी मी सह्याद्री या समितीचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी नायब तहसीलदार सतीश निकम, तलाठी जोशी उपस्थित होते.

ब्रह्मगिरीच्या उत्खनन झालेल्या भागाची पाहणी करून त्याचा अहवाल पर्यावरण विभागाला पाठवण्यात येणार आहे. यावेळी खा. खोसकर यांनी सूचना केली की, धोकादायक भागातील नागरिकांचे इतरत्र स्थलांतर करावे. तसेच यावेळी तज्ज्ञांनी बाधित भागाला संरक्षित उपाययोजना करण्याचे यावेळी सुचवले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com