जिंदालमधील धग कायम; कामगार मंत्र्यांंकडून पाहणी

रजिस्टरची चौकशी करणार: खाडे
जिंदालमधील धग कायम; कामगार मंत्र्यांंकडून पाहणी

घोटी । प्रतिनिधी | Ghoti

जिंदाल पॉलीफिल्म कंपनीतील (Jindal Polyfilm Company) जळीत घटना अत्यंत दुर्दैवी असून राज्य शासनाच्या (state government) वतीने आग (fire) विझवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत.

दुर्घटने दरम्यान कंपनीत नेमके किती कामगार (workers) कामावर होते व किती कामगारांना बाहेर काढण्यात यश आले. तसेच किती कामगार आतमध्ये अडकलेले आहेत, याबाबत कंपनीच्या रजिस्टरची चौकशी करून माहिती घेण्यात येईल, अशी माहिती कामगारमंत्री सुरेश खाडे (Labor Minister Suresh Khade) यांनी दिली. जिंदाल कंपनीत झालेल्या जळीत दुर्घटनेची पाहणी करून त्यांनी पत्रकार परिषदेत कंपनीतील घटनेच्या वस्तुस्थितीची माहिती खाडे यांनी प्रसार माध्यमांना दिली.

कामगार मंत्र्यांनी प्रत्यक्ष जिंदाल कंपनीत येऊन आग (fire) लागलेल्या प्लँटची पाहणी केली. काल सकाळी साडेअकरा वाजे दरम्यान लागलेली आग 24 तास उलटुनही सोमवार सकाळपर्यंत धुमसत होती. या दुर्घटनेत किती कामगार अडकलेले आहे आणि किती मृत्यूमुखी पडले आहे.

याबाबतची खरी माहिती लागलेली आग पूर्णपणे नियंत्रणात आल्यानंतरच मिळू शकेल असेही खाडे यांनी यावेळी सांगितले. कंपनी परिसरात मोठ्या प्रमाणात केमिकल (chemical) असल्यामुळे या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी फोमचा वापर करण्यात येत असून अग्निशामन दल (fire brigade), एनडीआरएफ (NDFR), सीआरपीएफच्या (CRPF) यंत्रणांना यश येईल असेही कामगार मंत्री सुरेश खाडे (Labor Minister Suresh Khade) यांनी सांगितले.

एक कामगार बेपत्ता

या दुर्घटनेत एक कामगार बेपत्ता असल्याची माहिती मिळाली असून त्याचे शोधकार्य सुरू झाले आहे. ही व्यक्ती कामावर असताना दवाखान्यात दाखल झालेली नसल्याने विविध शंका उपस्थित केल्या जात आहेत.

या दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाली आहे मात्र कंपनी प्रशासन माहिती लपवत आहे. या दुर्घटनेची उच्चस्तरामार्फत चौकशी करण्यात यावी.

- काशिनाथ मेंगाळ, माजी आमदार

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com