Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याआश्रमशाळेतील अत्याचार प्रकरणाची चौकशी

आश्रमशाळेतील अत्याचार प्रकरणाची चौकशी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

गेल्या नोव्हेंबरमध्ये म्हसरूळ (Mhasrul )येथील एका खासगी इमारतीमध्ये सुरू असलेल्या अनधिकृत आश्रमशाळेत ( unauthorized ashram school) संचालकानेच सहा मुलींवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेची आता राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून (National Human Rights Commissions )चौकशी सुरू झाली आहे.

- Advertisement -

राज्याचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यासाठी दोन दिवसांपासून नाशिकला तळ ठोकून आहेत. दीक्षित नाशिकमध्ये संबंधीत अधिकार्‍यांशी चर्चा करीत आहेत.आश्रमशाळांसंदर्भात प्रशासकीय बाबतीत सुधारणा करण्यास बराच वाव असून, समन्वयाची जबाबदारी निश्चित करण्याची गरज दीक्षित यांनी व्यक्त केली आहे. लागोपाठ घडलेल्या आश्रमशाळेतील मुलींवर अत्याचार केल्याच्या घटनांमुळे संपूर्ण राज्य हादरले होते. या प्रकरणाची दखल घेत राज्य आणि राष्ट्रीय महिला व बालहक्क आयोगाच्या सदस्यांनी नाशिकमध्ये येऊन चौकशी करीत कारवाईला दिशा दिली.

दीक्षित यांनी अधिकार्‍यांशी चर्चा करून त्यांच्याकडून माहिती जाणून घेत कागदपत्रांची तपासणी केली. म्हसरूळ येथे जाऊन तेथील आश्रमशाळा जागेची पाहणी केली. महिला बालकल्याण विभागाचे अधिकारी, पोलीस अधिकारी, तसेच आदिवासी विकास विभागातील अधिकार्‍यांशी चर्चा करून याप्रकरणी करण्यात आलेली कारवाई, उपाययोजना आणि मदतीबाबतची माहिती त्यांनी घेतली.

मुलींच्या सामाजिक आणि शैक्षणिक पुनर्वसनाबाबतही त्यांनी यंत्रणेच्या उपाययोजनांची माहिती घेत त्यांना काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या. मुलींच्या शिक्षणात कोणताही खंड पडता कामा नये, तसेच त्यांना सामाजिक सुंरक्षा देण्यासाठी उपाययोजनाही त्यांनी सुचवल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या