Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedनवीन एसी 3 कोचमुळे स्वस्तात होणार रेल्वे प्रवास, पाहा व्हिडिओ

नवीन एसी 3 कोचमुळे स्वस्तात होणार रेल्वे प्रवास, पाहा व्हिडिओ

नवी दिल्ली

भारतीय रेल्वेने एसी 3 कोच तयार केले आहेत. या कोचमध्ये 72 ऐवजी 83 सीट असणार आहे. रेल्वे मंत्री पियुश गोयल यांनी यासंदर्भातील एक व्हिडिओच शेअर केला. विशेष म्हणजे या कोचचे भाडे सामान्य एसी ३ डब्ब्यांपेक्षा कमी असणार आहे.

- Advertisement -

मेल आणि एक्सप्रेस गाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. एलएचबी प्लॅटफॉर्मवर तयार केलेल्या या एसी ३ कोचमध्ये 83 जागा तयार करण्यात आल्या आहेत. मेल आणि एक्सप्रेस गाड्यांमध्ये सामान्य एलएचबीचे एसी ३ डब्बे बसवण्यात आले आहेत. या कोचचे भाडे सामान्य एसी३ डब्ब्यांपेक्षा कमी असेल तर स्लीपर कोचपेक्षा थोडी जास्त असेल.

गरिब रथ या रेल्वे कोचच्या संकल्पनेवरुन एलएचबीने अशाप्रकारचे कोच तयार केले आहे. गरिब रथच्या साईडच्या तीन डब्ब्यांवर खूप टिका केली जाते मात्र यात अशाप्रकारचे कोच तयार केलेले नाहीत. एलएचबी प्लॅटफॉर्मवर तयार केलेल्या या एसी 3 कोचमध्ये 83 जागा तयार करण्यात आल्या आहेत. 15 टक्के जास्त सिट्स बसवण्यात आल्या आहेत.

स्विच बोर्ड कॅबिनेटला अंडर स्लंग करण्यात आले आहे. या कोचची ट्रायल यशस्वी झाली तर लोकप्रिय रेल्वेंच्या वेटींग लिस्टही कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. एका कोचमध्ये ११ बर्थ आहेत. २० डब्ब्यांच्या ट्रेनचा विचार केला तर २२० बर्थ होतात. नव्या एसी ३ कोचला वेटिंग लिस्टमध्ये टाकल्यास अतिरिक्त रेल्वे भाडे कमी करण्यास मदत होईल आणि लोकांना कमी भाड्यात एसी रल्वेचा प्रवास करता येईल.

या एसी३ कोचमध्ये प्रवाशांसाठी अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. अपंग नागरिकांसाठी स्वतंत्र बाथरुम तयार करण्यात आले आहे. प्रत्येक कोचला एसी व्हेंट देण्यात आला आहे. त्याचबरोबर दोन्ही बाजूला फोल्डिंग टेबल्स, पाण्याची बाटली ठेवण्यासाठी जागा, फोन, पुस्तके,मॅग्झिनची सुविधा करण्यात आली आहे. प्रत्येक सिटला रिंडींग लाईट आणि मोबाईल चार्ज करण्यासाठी प्लग देण्यात आला आहे. वरच्या सिटवर चढण्यासाठी असलेल्या शिडीची रचनाही बदलण्यात आली आहे.

कोचमधील जागा वाढविण्यासाठी दोन ते तीन सिट्सच्या पायांची उंची कमी करण्यात येते.पण या कोचमध्ये असे काही करण्यात आले नाही. कोचची उंची फक्त काही इंचांनी कमी करण्यात आली आहे. रेल्वेच्या सुरुवातीला तयार करण्यात आलेले बेडरोल ठेवण्यासाठी स्टोअर त्याचबरोबर जेवण गरम करण्यासाठी हॉट केस आणि बोर्ड कॅबिनेटही काढून टाकण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या