Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याशहरातील मालमत्ता, रस्ते यांची माहिती उपलब्ध होणार एका क्लिकवर

शहरातील मालमत्ता, रस्ते यांची माहिती उपलब्ध होणार एका क्लिकवर

नाशिक । प्रतिनिधी Nashik

महानगरातील प्रत्येक भागातील स्थावर मालमत्ता व त्यांची सध्यस्थितीची माहिती आता संगणकावर एका क्लिकसरशी उपलब्ध होणार आहे. स्मार्टसिटीच्या अंतर्गत हा प्रकल्प राबविण्यात आला होता. ते शहराचे जिओग्राफिकल मॅपिंगचे काम पूर्ण झाले आहे. लवकरच महापालिका क्षेत्राची माहिती नकाशावर उपलब्ध करून दिली जाणार आहे.

- Advertisement -

शहरातील रस्ता, प्लॉट, उद्याने, ड्रेनेज, जलवाहिन्यांची सविस्तर माहीती संकलित कर्यात आलेली आहे. या माहितीचे जिओग्राफिकल मॅपिंगचे काम पूर्ण झालेले आहे. शहराचे 31 शिवारात विभागणी करण्यात आलेली असून, प्रथमत: प्रायोगिक तत्त्वावर एक शिवार निश्चित करून संपूर्ण माहितीचे डिजिटायझेशन केले जाणार आहे. टप्प्याटप्प्याने शहरातील सर्व शिवारांचे डिजिटायझेशन करून संपूर्ण महापालिका क्षेत्राची माहिती नकाशावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. मात्र आर्टिलरी सेंटर, पोलीस अकादमी, सीएनपी, आयएसपीआदी ठिकाणी सुरक्षिततेच्या कारणावरुन जीआयएस मॅपिंगमधून वगळण्यात आले आहे.

शासनाच्या सूचनेनुसार महापालिकेने भौगोलिक माहिती प्रणालीच्या आधारे शहरातील रस्त्यांचे जमीन योजना (लॅण्ड प्लॅन अ‍ॅण्ड लॅण्ड शेड्युल) प्रमाणिकृत करण्याचा निर्णय घेतला.महापालिका हद्दीत सुमारे 270 चौरस किलोमीटर क्षेत्राचे जीपीएस मॅपिंग करण्यात आले.शहरातील मालमत्ता रस्ते यांची माहती संकलित करुन जीआयएस मॅपिंगवर टाकण्यात आली आहे. संकलित केलेली माहिती मनपाच्या वेबसाईटवर अपलोड करण्याची प्रक्रिया सूरू असून, ती पूर्ण झाल्यानंतर नागरीकांना ही माहिती एका क्लिकवर उपलब्ध करुन दिली जाणार आहे.

प्रशासनासाठी उपयुक्त

जिओग्राफिकल मॅपिंगमुळे शहरातील अतिक्रमण तत्काळ कळू शकेल, रस्ते, जमिनीचे ले-आउट, उद्याने, विद्युत ट्रान्सफॉर्मर्स, एमएनजीएलची पाइपलाइन, ड्रेनेज पाइप, विहिरी, टेलिफोनचे जाळे, रस्त्यांची लांबी व रुंदी, प्लॉटची लांबी व रुंदी, इमारतींच्या फुटप्रिंट, अ‍ॅमिनिटी स्पेस आदींची सविस्तर माहीती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.

जीआयएस मॅपिंगचे काम पूर्ण झाले असले तरी त्यांचे अपलोडींग हे टप्पा टप्पाने केले जाणार आहे. त्यामुळे लवकरच नागरिकांना एका क्लिकवर संपूर्ण शहराच्या जागांची माहीती मिळेल. यात मनपाच्या मालकीच्या जागा, उद्याने यांचेही सविस्तर विवरण राहणार आहे.

– हर्षल बाविस्कर, उपसंचालक, नगररचना, महापालिका

- Advertisment -

ताज्या बातम्या