Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यागौतम अदानींनी घेतली शरद पवारांची भेट; तब्बल दोन तास बंद दाराआड चर्चा?

गौतम अदानींनी घेतली शरद पवारांची भेट; तब्बल दोन तास बंद दाराआड चर्चा?

मुंबई | Mumbai

संसदेच्या हिवाळी अधिवेशनावेळी गौतम अदानी (Gautam Adani) यांनी २० हजार कोटींचा भ्रष्टाचार केला असा हिंडेनबर्गचा अहवाल समोर आला होता. त्यानंतर यावरून विरोधकांनी उद्योगपती गौतम अदानी यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती…

- Advertisement -

खारघर दुर्घटनेतील मृतांचा पोस्टमॉर्टम अहवाल आला समोर; धक्कादायक माहिती उघडकीस

तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) काही दिवसांपूर्वीच हिंडेनबर्ग हे नाव आपण ऐकले नसल्याचे म्हटले होते. तसेच जेपीसी (Joint Parliamentary Committee) चौकशीला विरोध केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यातच आज गौतम अदानी यांनी शरद पवारांची सिल्व्हर ओकवर भेट घेतल्याने तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. या भेटी दरम्यान दोघांमध्ये तब्बल दोन तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली असून भेटीमागचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.

Breaking News : नाशकात आयकर विभागाची छापेमारी

दरम्यान, काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत अदानी प्रकरणाची जेपीसीद्वारे चौकशी करण्याची गरज नाही. त्यांची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशीच योग्य आहे, असे म्हटले होते. तसेच जेपीसी स्थापन केली तर त्यात विरोधी पक्षांचे संख्याबळ कमी राहील. सत्ताधाऱ्यांचे संख्याबळ सर्वाधिक राहील. त्यामुळे जेपीसी समितीचा अहवाल आला तरी त्याचा काही उपयोग होणार नाही, असे पवारांनी म्हटले होते. पवारांच्या या विधानानंतर देखील काँग्रेसने (Congress) जेपीसीची मागणी लावून धरली होती. या सर्व पार्श्वभूमीवर अदानी यांनी पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या