Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रकोरोना लसीवर इंदुरीकर महाराजांचा यु-टर्न, आता म्हणाले...

कोरोना लसीवर इंदुरीकर महाराजांचा यु-टर्न, आता म्हणाले…

जालना :

नाशिक जिल्ह्यातील घोटी (Ghoti) येथे कृपी उत्पन्न बाजार समितीमध्ये (APMC) शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. याठिकाणी इंदुरीकर महाराजांच्या (Indurikar Maharaj) किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांनी करोना लसीबाबत खळबळ उडवून देणारे वक्तव्य केले होते

- Advertisement -

हार्दिक पांड्या उंची घड्याळांचा शौकिन, पाहा त्याच्याकडचे कलेक्शन

इंदुरीकर ( indurikar maharaj) यांनी कोरोना प्रतिबंधक लस (corona vaccination) घेणार नाही, असे वक्तव्य केले. त्यांच्या या विधानावरून सोशल मिडिया ( social media ) वरती देखील त्यांच्यावर टीका होऊ लागली होती. आता इंदुरीकर महाराजांनी त्यांच्या वक्तव्यावरून युटर्न घेत कोरोना जनजागृतीला सुरुवात केली आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा विचार करता महाराष्ट्रातील लसीकरणाचा वेग वाढविणे गरजेचे आहे. त्यामुळे धार्मिक नेते आणि बॉलीवूड सेलिब्रिटींच्या माध्यमातून कोरोना जनजागृती केली जाणार आहे. त्यासाठी अभिनेता सलमान खानला देखील पुढे आणण्याचा विचार सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री टोपेंनी दिली होती. त्यानंतर लसीकरणाच्या जनजागृतीमध्ये इंदुरीकर महाराजांचा समावेश करण्यात आला.

सलमानने सांगितले, त्याची कोट्यावधीची मालमत्ता कोणाला देणार?

इंदुरीकर महाराजांचे जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे कीर्तन होते. त्यावेळी त्यांनी इंदुरीकरांची हरीपाठाची एक आणि टोपेंच्या दोन कोरोना लस घ्या, कोरोनामुक्त व्हा, असा सल्ला नागरिकांना दिला आहे. कोरोनाला हरविण्यात पोलिस, डॉक्टर, सामाजिक संस्थांचं मोठं योगदान आहे. खरा कोरोना योद्धा राजेश टोपे असल्याचेही इंदुरीकर म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या