कीर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या वाहनाला अपघात

कीर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या वाहनाला अपघात

संगमनेर | प्रतिनिधी

समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर (Indurikar Maharaj) यांच्या गाडीला अपघात (Accident) झाला आहे.

जालना (Jalna) जिल्ह्यातील परतूर (Partur) येथे जात असतांना त्यांच्या गाडीला अपघात झाला. बुधवारी रात्री १० च्या सुमारास परतूर गावाजवळच्या एका पेट्रोलपंप समोर त्यांच्या वाहनाला अपघात झाला.

सुदैवाने अपघातातून इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj Accident) बचावले आहेत. त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. दरम्यान त्यांच्या वाहनाचे संजय गायकवाड अपघातात जखमी झाले आहे.

या अपघातानंतर अपघात स्थळावरून इंदोरीकर महाराज यांना दुसऱ्या वाहनाने कार्यक्रम स्थळी पोचवण्यात आले. या ठिकाणी त्यांचे किर्तन नियोजित वेळेत पार पडले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com