Sunday, April 28, 2024
Homeदेश विदेशधक्कादायक! भीषण आगीत सात जणांचा होरपळून मृत्यू

धक्कादायक! भीषण आगीत सात जणांचा होरपळून मृत्यू

इंदौर | Indore

मध्य प्रदेशातील इंदौर शहरात भीषण दुर्घटना घडली आहे. एका घराला भीषण आग लागून ७ जणांचा जिवंत जळून मृत्यू झाल्याची घटना इंदौर शहरातील स्वर्णबाग कॉलनीत घडली आहे.

- Advertisement -

ही घटना साधारण पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली आहे. जेव्हा आग लागली तेव्हा या घरात राहणारे लोक गाढ झोपेत होते. बहुतेकांचा झोपेत गुदमरून मृत्यू झाला.

या घटनेत पाच पुरुष आणि दोन महिलांसह सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल केलं असून ही आग विझवण्यासाठी आम्हाला तीन तास लागले असं अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यानी सांगितलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या