
नवी दिल्ली
स्वस्तात विमान प्रवास (Cheap air ticket) करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. इंडिगोने (Indigo) १५ व्या वर्धापन दिनानिमित्त (15th anniversary sale) एक विशेष ऑफर घेऊन आली आहे. या ऑफरचा लाभ आजपासून म्हणजेच ४ ऑगस्ट ते ६ ऑगस्टपर्यंत घेता येणार आहे. कंपनीला 15 वर्षे पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी हा खास सेल (Indigo Offer)आणला आहे.
इंडिगोचे (Indigo)मुख्य कार्यकारी अधिकारी रोनोजॉय दत्ता यांनी सांगितले की “आमच्यासाठी ही महत्वपुर्ण संधी आहे. कारण १५ वर्ष पुर्ण झाल्याचा आनंद आम्ही साजरा करत आहे. आम्ही आमचे ग्राहक व कर्मचाऱ्यांचे या माध्यमातून आभार व्यक्त करु इच्छितो. ”
इंडिगोने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. कंपनीने ट्विटमध्ये म्हटले आहे की, या ऑफर अंतर्गत तुम्ही फक्त ९१५ रुपयांमध्ये विमान प्रवास करू शकता. १ सप्टेंबर २०२१ ते २६ मार्च २०२२ दरम्यान प्रवासी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी या ऑफरचा लाभ घेऊ शकतात.
तसेच ‘फास्ट फॉरवर्ड, 6ई फ्लेक्स, 6ई बैगपोर्ट’ सह ‘6ई’ ऐड-ऑन 315 रुपयात देण्यात येणार आहे.