Saturday, April 27, 2024
Homeदेश विदेशसरकारने सांगितला कोरोना लसीचा आरखडा, यांना मिळणार आधी लस

सरकारने सांगितला कोरोना लसीचा आरखडा, यांना मिळणार आधी लस

नवी दिल्ली

कोरोना लसीसंदर्भात भारतात लवकरच चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले की, पुढील काही आठवड्यात लस निर्मितीस परवानगी दिली जाऊ शकते. भारतात सीरम, भारत बायोटेक व फाइजर या कंपन्यांनी इमरजेंसी अप्रूवल मागितली आहे.

- Advertisement -

आता मोदी सरकराने ही लस पहिल्यांदा कोणाला मिळणार याचा प्राधान्यक्रम (Covid 19 vaccination plan India) जाहीर केला आहे. अत्यंत शिस्तबद्द आणि संगणकीकृत पद्धतीने लशीचं वितरण होईल, असे आरोग्य मंत्रालयातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. पहिल्या टप्यात एक कोटी आरोग्य सेवक (फ्रण्ट लाइन वर्कर्स) यांना लस मिळणार आहे. लसीकरण ही फक्त राज्याची किंवा केंद्राची जबाबदारी नाही, त्यामध्ये जनतेचा सक्रिय सहभाग अपेक्षित आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी मंगळवारी स्पष्ट केलं.

मोदी सरकारच्या वतीने आरोग्य मंत्रालयातर्फे मंगळवारी देशातल्या कोरोना परिस्थितीचा (Covid-19) आढावा घेण्यात आला. भारतात पॉझिटिव्हिटी रेट कमी होत असल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आलं. पण लस आली तरी कुठल्याही परिस्थितीत आहे त्या नियमांमध्ये किंवा घेत असलेल्या काळजीमध्ये बदल करता कामा नये, असेही आरोग्य मंत्रालयातर्फे स्पष्ट करण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या