IND vs ENG : तब्बल ५० वर्षांनी ओव्हलवर झळकला तिरंगा; इंग्लंड १५७ धावांनी पराभूत

IND vs ENG : तब्बल ५० वर्षांनी ओव्हलवर झळकला तिरंगा; इंग्लंड १५७ धावांनी पराभूत

लंडन | London

केनिंग्टन ओव्हल मैदानावर (oval cricket ground) चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने (India) विजयी तिरंगा फडकावला आहे. अत्यंत रोमांचक ठरलेल्या या कसोटीत विराटसेनेने इंग्लंडला १५७ धावांनी पराभूत करून तब्बल ५० वर्षांचा दुष्काळ संपवला आहे...

सामन्यात पाचव्या दिवसाअखेर इंग्लंड संघाला (England) २९१ धावांची गरज होती. इंग्लंड संघाकडे संपूर्ण संघ फलंदाजीसाठी शिल्लक होता. परंतु भारतीय गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करीत इंग्लंडच्या फलंदाजांना तंबूत पाठवले.

लंचनंतर खेळपट्टीने आपला रंग बदलला आणि जडेजासह बुमराहने आपले कौशल्य दाखवायला सुरुवात केली. १९७१ मध्ये भारताने अजित वाडेकर (Ajit Wadekar) यांच्या नेतृत्वात या मैदानावर शेवटचा कसोटी विजय मिळवला होता. आता हा विजय संपादन करून तब्बल ५० वर्षांचा दुष्काळ संपवला आहे. या विजयासह मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com