हरनाज संधू मिस युनिव्हर्स : 21 वर्षानंतर भारताकडे मुकूट

हरनाज संधू मिस युनिव्हर्स : 21 वर्षानंतर भारताकडे मुकूट

नवी दिल्ली

हरनाज संधूने (Harnaaz Sandhu)८० देशांतील मुलींना हरवून मिस युनिव्हर्स (Miss Universe)२०२१ स्पर्धा जिंकली आहे. चंदीगडची मॉडेल आणि अभिनेत्री हरनाज संधू हिने ७० व्या मिस युनिव्हर्समध्ये मिस युनिव्हर्स 2021 चा मुकुट पटकावला आहे. सुष्मिता सेन आणि लारा दत्ता यांच्यानंतर ती मिस युनिव्हर्सचा किताब जिंकणारी तिसरी भारतीय आहे.मिस युनिव्हर्स (Miss Universe)म्हणून आपलं नाव घोषित होताच हरनाज संधूच्या (Harnaaz Sandhuडोळ्यात आनंदाश्रू तरळल्याचं पाहायला मिळालं.

याआधी १९९४ मध्ये सुष्मिता सेनने मिस युनिव्हर्सचा किताब जिंकून देशाचं नाव उंचावलं होतं. यानंतर लारा दत्ताने २००० मध्ये ही स्पर्धा जिंकली आणि अनेक सुंदर मॉडेलना हरवून मिस युनिव्हर्सचा किताब भारतात आणला होता. आता २०२१ मध्ये देशातील ८० स्पर्धकांना पराभूत करून हा विजय मिळवणाऱ्या हरनाज संधूने देशाची शान वाढवली आहे.

हरनाज संधू मिस युनिव्हर्स : 21 वर्षानंतर भारताकडे मुकूट
या फोटोंनी सोनाली कुलकर्णीचे खुललं सौंदर्य

पंजाबी चित्रपटांमध्येही काम

हरनाज संधू मूळ चंदिगडची असून ती २१ वर्षांची आहे. हरनाज संधूने 'यारा दियां पौ बरन' आणि 'बाईजी कुटंगे' सारख्या पंजाबी चित्रपटांमध्येही काम केले आहे. चंदीगडच्या एका शीख कुटुंबात वाढलेल्या हरनाजला लहानपणापासूनच फिटनेस आणि फॅशनमध्ये रस होता. तिने अनेक ब्युटी इव्हेंटमध्येही भाग घेतला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com