Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशजगात सर्वात स्वस्त भारताचीच लस

जगात सर्वात स्वस्त भारताचीच लस

भारतातील लस जगात सर्वात स्वस्त आहे. भारतात सीरम इन्स्टिट्यूटची कोविशील्ड (covishield) व भारत बायोटेकची कोवॅक्सीन covaccine लस आहे. या दोन्ही लसीच्या किमती २५० रुपये आहे. सरकारी केंद्रात या लसी मोफत देण्यात येत आहे.

कोरोनास ज्यांनी जन्म घातला त्या चीनची लस जगात सर्वात महागडी आहे. त्या तुलनेत भारतीय बनावटीच्या लसीची किंमत अत्यंत कमी आहे. तसेच भारतीय बनावटीची लस ही ट्रान्सपोर्टपासून ते स्टोरेजपर्यंत भारतातील वातावरणाला पुरक आहे.

- Advertisement -

जगभरातील दर

कोरोना व्हॅक – २२०० रुपये (चीन)

बीएनटी १६२ – १४०० रुपये (अमेरिका)

एमआरऐएन १२७३ – १३०० रुपये (युरोपियन युनियन)

स्पुतनिक व्ही- ७३० रुपये (रुस)

कोव्हिशिल्ड – ३९० रुपये ( सोदी अरेबिया व दक्षिण अफ्रिका)

कोव्हिशिल्ड- ३७० रुपये (ब्राझील)

कोव्हॅक्सीन -२५० रुपये (भारत)

कोव्हिशिल्ड -२५० रुपये (भारत)

दोन डोस घ्यावे लागणार

कोरोना लसीचे दोन डोस घेणं अत्यंत गरजेचं आहे. एक डोस घेतल्यानंतर दुसरी लस घेण्यास विसरलो असं चालणार नाही. एक लस घेतल्यानंतर पुढे महिन्याभरानंतर दुसरी लस घेणं गरजेचं आहे.

अशी करा नोंदणी

१) https://selfregistration.cowin.gov.in/ या संकेतस्थळावर जा.

२) संकेतस्थळावर गेल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर विचारला जाईल आणि त्यावर OTP येईल. तो OTP टाकल्यानंतर नवीन विंडो उघडेल.

३) Register for Vaccination ची विंडो दिसेल. फोटो आयडी प्रूफ, फोटो आयडी नंबर, नाव, जन्मतारीख, लिंग इत्यादी माहिती इथे तुम्हाला द्यावी लागेल. त्यानंतर Register पर्यायावर क्लिक करा.

४) तुम्हाला अकाऊंट डिटेल्स दिसतील. या अकाऊंट डिटेल्सच्या पानावरच युजर लसीकरणाची तारखी देऊ शकतात. नंतर तुम्ही लसीकरण केंद्रासाठीही संपूर्ण माहिती भरू शकता. राज्य, जिल्हा, ब्लॉक आणि पिन कोड अशी माहिती दिल्यानंतर सर्च पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला लसीकरण केंद्रांची यादी दिसेल.

५) तुम्हाला जवळ असलेल्या केंद्रावर क्लिक केल्यानंतर उपलब्ध वेळ सांगितली जाईल. तिथे Book पर्यायावर क्लिक केल्यानंतर Appointment Confirmation चं पान उघडेल. तिथे Confirm करा. तुम्हाला नोंदणी झाल्याचा संदेश स्क्रीनवर दिसेल. ते पान तुम्हाला डाऊनलोडही करता येईल.

६) लसीकरणासाठी ६० वर्षावरील तसेच ४५ वर्षांपेक्षा अधिक आणि सहव्याधी असलेले व्यक्तींसाठी आधार कार्ड, छायाचित्र असलेले मतदान कार्ड, ऑनलाइन नोंदणीच्या वेळी जर आधार कार्ड किंवा मतदान कार्ड या व्यतिरिक्त अन्य फोटो आयडी वापरले असेल तर ते सोबत आणावे लागतील.

- Advertisment -

ताज्या बातम्या