टीम इंडियाला मोठा धक्का! ‘हा’ खेळाडू T20 World Cup मधून बाहेर

jalgaon-digital
1 Min Read

मुंबई | Mumbai

भारतीय संघाला (Indian Team) टी२० विश्वचषकाआधी (T20 World Cup) मोठा धक्का बसला आहे. संघातील प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) दुखापतीमुळे संघातून बाहेर झाला आहे. आगामी टी२० विश्वचषकाच्या दृष्टीने भारतीय संघ तयारी करत असून सध्या दक्षिण आफ्रिकेविरोधात (South Africa) टी२० मालिका खेळत आहे…

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जसप्रीत बुमराह हा पाठीच्या दुखापतीमुळे पुढील पाच ते सहा आठवडे खेळू शकणार नाही. त्यामुळे आता भारतीय संघाला रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि जसप्रित बुमराह या दोन खेळाडूंच्या अनुपस्थितीत विश्वचषक जिंकणे सोपे नसणार आहे. तर येत्या १६ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात टी२० विश्वचषकास सुरुवात होणार आहे.

Navratrotsav 2022 : नाशिकमधील ‘या’ दहा देवींचे दर्शन घ्या एका क्लिकवर…

दरम्यान, दुखापतीमुळे आशिया चषकमध्ये (Asia Cup) देखील बुमराह खेळला नव्हता. तसेच बुमराने यंदा फार कमी आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्याने फेब्रुवारीत श्रीलंकेविरुद्ध दोन, ऑगस्टमध्ये इंग्लंडविरुद्ध एक आणि नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत दोन असे एकूण ५ टी २० सामने खेळले आहेत.

IMD : राज्यात पुढील तीन दिवस विजांच्या कडकडाटासह पाऊस

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *