खुशखबर : रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांच्या पगाराइतका बोनस

खुशखबर : रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांच्या पगाराइतका बोनस
रेल्वे

नवी दिल्ली

केंद्रीय मंत्रिमंडळाने राजपत्रित (Non Gazetted) नसलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांच्या पगाराइतके बोनस मंजूर केला आहे. यामुळे सुमारे 11.56 लाख नॉन-गॅझेटेड रेल्वे कर्मचाऱ्यांना फायदा होईल, असे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले.

रेल्वे
खडसेंवर शस्त्रक्रिया होणार, वकिलांनी दिली कोर्टात माहिती

आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दोन विभागांबाबत निर्णय घेण्यात आले. वर्षानुवर्षे, प्रोडक्टिविटी लिंक बोनस रेल्वेच्या राजपत्रित नसलेल्या कर्मचाऱ्यांना मिळत आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे की, यावर्षीही रेल्वेच्या राजपत्रित नसलेल्या कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस दिला जाईल. रेल्वे आपल्या कर्मचाऱ्यांना दरवर्षी बोनस देते. गेल्या वर्षी देखील कोरोना संकटाच्या वेळी रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस मिळाला होता.या बोनसची रक्कम दसरा सणापूर्वी त्यांच्या त्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे.

Related Stories

No stories found.