दिंडोरीत इंडियन ऑईल उभारणार भव्य प्रकल्प

साडेतीनशे कोटींची गुंतवणूक; हजारो बेरोजगारांना काम
दिंडोरीत इंडियन ऑईल उभारणार भव्य प्रकल्प

सातपूर | प्रतिनिधी | Satpur

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (Indian Oil Corporation) उद्योगसमूहाने अक्राळे, दिंडोरी (Akrale, Dindori) येथे उद्योग स्थापन करण्याबाबतच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यामुळे दिंडोरीत आणखी एक मोठा उद्योग स्थापन होत असल्याने उद्योग क्षेत्रातून समाधान व्यक्त केले जात आहे...

अक्राळे औद्योगिक वसाहतीमध्ये (Akrale Industrial Area) इंडियन ऑईल कॉर्पोरेशनद्वारे 50 एकरच्या भूखंडावर प्रकल्प उभारला जाणार आहे.

एमआयडीसीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक कृष्णा (Abhishek Krishna) यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या वतीने प्लांट हेड जीपीएस सिंग यांच्यासह अधिकाऱ्यांनी चर्चेत सहभाग घेतला.

अक्राळेत उभारला जाणाऱ्या इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या या प्रकल्पात क्रायजेनीक सिलेंडर्सची निर्मिती केली जाणार आहे. हे सिलेंडर्स ऑक्सिजन (Oxygen), नायट्रोजनच्या (Nitrogen) वापरासाठी परदेशात मोठ्या प्रमाणात मागवली जातात.

हा प्रकल्प शतप्रतिशत निर्यातक्षम उद्योग आहे. सुमारे 350 कोटी रुपयांची यात गूंतवणूक होणार आहे. यामुळे हजारो हातांना रोजगारी संधी प्राप्त होईल. सोबतच पूरवठादार व छोट्या उद्योगांनादेखील ही संधी लाभकारी ठरणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com