Monday, April 29, 2024
Homeदेश विदेशभारतीय नौदलाचा नवा ध्वज शिवरायांनी समर्पित : पंतप्रधान मोदी

भारतीय नौदलाचा नवा ध्वज शिवरायांनी समर्पित : पंतप्रधान मोदी

मुंबई | Mumbai

आजचा दिवस हा भारतीय नौदलासाठी (indian navy) महत्त्वाचा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (pm narendra modi) हस्ते आज कोचीच्या शिपयार्डमध्ये स्वदेशी आयएनएस विक्रांत (ins vikrant) हे युद्धवाहू जहाज आज नौदलाच्या ताफ्यात दाखल झालं.

- Advertisement -

याच वेळी पंतप्रधानांच्या हस्ते भारतीय नौदलाच्या नवीन ध्वजाचं (indian navy new flag) अनावरण करण्यात आलं आहे. भारतीय नौदलाच्या नव्यानं अनावरण करण्यात आलेल्या ध्वजावर एका बाजूला डाव्या कोपऱ्यात भारताचा राष्ट्रध्वज आहे तर त्याच्या बाजूला भारतीय नौदलाचं चिन्ह आहे. नौदलाचा नवा ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांना (chhatrapati shivaji maharaj) समर्पित करत असल्याचं मोदींनी म्हटलं.

नौदलाचा नवा ध्वज जवानांना नवी उर्जा देईल. आजपासून नौदलाचा नवा ध्वज फडकत राहिल असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदलाचा नवा ध्वज छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्पित करत असल्याचे म्हटले आहे. त्याच बरोबर शिवाजी महाराज यांनी आरमार दलाचं महत्त्व जाणलं, त्यांनी नौदलाचा विकास केला. असही मोदी म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या