Monday, April 29, 2024
Homeदेश विदेशINS मोरमुगाव भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल, जाणून घ्या या युद्धनौकेची वैशिष्ट्ये

INS मोरमुगाव भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल, जाणून घ्या या युद्धनौकेची वैशिष्ट्ये

मुंबई | Mumbai

स्वदेशी बनावटीची मिसाइल डिस्ट्रॉयर ‘मुरगाव’ आज भारतीय नौदलाला सुपूर्द करण्यात आली. नेव्हल डॉकयार्ड, मुंबई येथे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडला.

- Advertisement -

भारतीय नौदलाच्या म्हणण्यानुसार, ही युद्धनौका रिमोट सेन्सर मशीन, आधुनिक रडार, जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे तसेच जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे यासारख्या शस्त्र प्रणालींनी सुसज्ज आहे.

163 मीटर लांब आणि 730 टन वजन असलेल्या या युद्धनौकेत क्षेपणास्त्रांना चकवा देण्याची क्षमता आहे. ६५ टक्के स्वदेशी तंत्रज्ञानाने बांधलेली ही युद्धनौका स्टेल्थ तंत्रज्ञानाने तयार करण्यात आली आहे. युद्धनौकेला चार शक्तिशाली गॅस टर्बाइनद्वारे चालविले जाते. यामुळे, ही युद्धनौका 30 नॉट्सपर्यंतचा वेग पकडू शकते.

ही युद्धनौका आण्विक, जैविक आणि रासायनिक युद्धाच्या वेळीही बचाव करण्यास सक्षम आहे. कारण रडार देखील युद्धनौकेला सहज पकडू शकत नाही. या युद्धनौकेवर 50 अधिकाऱ्यांसह 250 नौदल कर्मचारी तैनात असतील. समुद्रात 56 किलोमीटर प्रतितास (30 नॉटिकल मैल) वेगाने धावणारी ही युद्धनौका 75 हजार चौरस किलोमीटर सागरी क्षेत्रावर लक्ष ठेवू शकते.

- Advertisment -

ताज्या बातम्या