तिरंगा
तिरंगा|Indian flag
मुख्य बातम्या

तिरंगा फडकवायचा? वाचा हे नियम

काय आहे भारतीय ध्वज संहिता- २००२

jitendra zavar

jitendra zavar

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून तिरंगाला राष्ट्रीय ध्वज म्हणून २२ जुलै १९४७ रोजी स्वीकारले गेले. आंध्रप्रदेशच्या पिंगली वेंकैय्या या स्वातंत्र्य सेनानीने हा तिरंगा बनवला. खेदाची बाब म्हणजे राष्ट्रीय ध्वज निर्माण करणाऱ्या या गरिब व्यक्तीचे निधन १९६३ मध्ये एका झोपडीत झाले. कर्नाटकातल्या हुबळीमधल्या कर्नाटक खादी ग्रामोद्योग संयुक्त संघ या एकमेव परवानाप्राप्त संस्थेकडून तिरंगा बनवला जातो. त्यानंतर त्याचा सर्वत्र पुरवठा केला जातो. Indian flag hoisting code of conduct

भारतीय ध्वज संहितेनुसार तिरंगा फडकावण्याचे नियम निर्धारीत केले आहे. यानुसार एखाद्याने चुकीच्या पध्दतीने तिरंगा फडकावल्यास त्याला कारावास आणि दंडही होऊ शकतो.

१) तिरंगा नेहमी सुती, रेशीम किंवा खादीपासून बनलेला असावा. तसेच ३:२ या गुणोत्तरात आयताकृती आकाराचा असला पाहिजे. अशोकचक्रात २४ आरे असणेही आवश्यक आहे.

२ ) राष्ट्रध्वज गाड्या, होड्या, विमाने यांच्या टपावर किंवा पाठीमागे तो बांधू नये.

३) राष्ट्रीय ध्वजाचे स्थान हे सर्वोच्च असते.राष्ट्रध्वजापेक्षा अधिक उंचीवर दुसरा झेंडा फडकवू नये. झेंड्यावर कोणतीही वस्तू, चिन्ह, फुल, हार ठेवू नयेत. पण राष्ट्रीय उत्सवांच्या दिवशी ध्वजवंदनापूर्वी झेंड्यात फुले ठेवण्यास परवानगी आहे.

४) ध्वजावर काहीही लिहिणे बेकायदेशीर आहे. त्याचप्रमाणे कोणत्याही परिस्थितीत ध्वजाचा जमिनीला स्पर्श होता कामा नये. लोकांना घरात आणि कार्यालयात सामान्य दिवशी तिरंगा फडकावण्याची अनुमती २२ डिसेंबर २००२ नंतर देण्यात आली.

५) राष्ट्रध्वजाला माती व पाण्याचा स्पर्श होऊ देऊ नये. ध्वज फडकविताना तो फाटणार नाही, अशा पद्धतीने बांधला पाहिजे.

६) सुर्यादय व सुर्यास्तापर्यंतच राष्ट्रध्वज फडकवला जातो.

७) फाटलेला, मळलेला झेंडा फडकवला जाऊ नये.

८) विशेष प्रसंगी झेेंडा रात्री फडकवला जातो.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com