Monday, April 29, 2024
Homeदेश विदेशOdisha Train Accident : अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सेहवाग सरसावला; केली मोठी घोषणा

Odisha Train Accident : अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सेहवाग सरसावला; केली मोठी घोषणा

नवी दिल्ली | New Delhi

ओडिशातील बालासोर जिल्ह्यात शुक्रवारी (2 जून) शालीमा-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेस (Coromandal Express Accident), बेंगळुरू-हावडा सुपर फास्ट आणि एक मालगाडी यांच्यात झालेला भीषण अपघात भारतीय रेल्वेच्या इतिहासातील सर्वात मोठ्या अपघातापैकी एक ठरला आहे. या अपघातात २८८ जणांचा जीव गेला तर १ हजार पेक्षा जास्त जण जखमी आहेत. या घटनेनंतर भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) पीडितांना मदतीची घोषणा केलीय.

- Advertisement -

विरेंद्र सेहवागने रविवारी रात्री एक ट्विट करत बालासोर ट्रेन दुर्घटनेतील पीडितांच्या मुलांसाठी मदतीचा हात पुढे केला असून सेहवागने ट्विट केले की, ज्या मुलांचे आई-वडील या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेत त्या सर्व मुलांना निशुल्क शिक्षण दिले जाईल. या दुःखाच्या प्रसंगी, या दुःखद अपघातात ज्यांनी प्राण गमावले आहेत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची काळजी घेणे एवढेच मी करू शकतो.

“…नाहीतर एकेकाच्या कानाखालीच”; अजितदादा का भडकले?

मी अशा मुलांना सेहवाग इंटरनॅशनल स्कूलच्या (Sehwag International School) बोर्डिंग सुविधेत मोफत शिक्षण देतो. तसेच बचाव कार्यात आघाडीवर राहिलेल्या सर्व शूर स्त्री-पुरुषांना आणि स्वेच्छेने रक्तदान करणाऱ्या वैद्यकीय पथकाला आणि स्वयंसेवकांना सलाम करतो तसेच यामध्ये आम्ही एकत्र आहोत.

विरेंद्र सेहवागच नाही तर उद्योगपती गौतम अदानी यांनीही अशीच घोषणा केली असून अदानी समुहाचे प्रमुख गौतम अदानी यांनी रविवारी ट्विटरवर म्हटले की, आई-वडील गमावलेल्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च अदानी ग्रुप करेल.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

- Advertisment -

ताज्या बातम्या