Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्यापंतप्रधान मोदींच्या भेटीने लष्करी अधिकारी भावूक

पंतप्रधान मोदींच्या भेटीने लष्करी अधिकारी भावूक

नवी दिल्ली | New Delhi

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आज कारगिलमधील सशस्त्र दलातील (Armed forces) सैनिकांसोबत दिवाळी (Diwali) साजरी केली…

- Advertisement -

कारगिलमधील (Kargil) लष्करातील अधिकारी जेव्हा पंतप्रधानांची भेट घेत होते, त्यावेळी एका युवा सैन्य अधिकाऱ्याने त्याच्या आयुष्यातील आठवण पंतप्रधान मोदींना सांगितली. नरेंद्र मोदी जेव्हा गुजरातचे (Gujarat) मुख्यमंत्री होते, त्यावेळी या लष्करी अधिकाऱ्याने (Military Officer) मोदींची भेट घेतली होती. त्या भेटीचा फोटो आज मेजर अमित यांनी नरेंद्र मोदींना भेट दिल्यावर दोघेही भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान, लष्करी अधिकारी मेजर अमित गुजरातमधील बालाचडीतील (Balachadi) सैनिक स्कूलमध्ये जेव्हा शिकत होते, त्यावेळी त्यांनी मोदी यांच्या हस्ते बक्षीस स्वीकारतानाचा फोटो काढला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या