Thursday, April 25, 2024
HomeनाशिकVideo : तोपची 2023 - लष्करी जवानांचा प्रात्यक्षिकांचा थरार

Video : तोपची 2023 – लष्करी जवानांचा प्रात्यक्षिकांचा थरार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

भारतीय बनावटीच्या शत्रूचा नायनाट करण्यासाठी धडाडणार्‍या तोफा. त्याच्याद्वारे परिसरात पसरणारा कानठळ्या बसविणारा आवाज. ध्वनीपेक्षाही जलद गतीने झेपावणारे तोफगोळे. क्षणार्धात वेधला जाणारे अचूक लक्ष्य. एकापाठोपाठ धडाडणार्‍या तोफांमुळे प्रत्यक्ष युद्धभूमीचा थरार (Thrill of the Battlefield) देणारी प्रात्यक्षिके लष्करी जवानांनी मोठ्या साहसाने प्रदर्शित केली…

- Advertisement -

लष्कराच्या देवळाली आर्टिलरी सेंटरच्या (Deolali Artillery Centre) वतीने दरवर्षी ‘तोपची’ या युध्दात सहभागी होणार्‍या विविध तोफांचे शक्ती प्रदर्शन केले जाते. लेफ्टनंट जनरल हरिमोहन अय्यर (Harimohan Iyer) यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘तोपची २०२३’ उत्साहात पार पडला. यावेळी आर्टलरी सेंटर मिलिटरी बँडद्वारे राष्ट्रगीत वादनाने कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

याप्रसंगी जवानांनी रशियन तोफ एफओएमएम, १३० मिलीमीटर तोफ,१५५ एमएम सोल्टम तोफ, बोफोर्स तोफ, पिनाका रॉकेट, पर्शियन बनावटीचे स्मच रॉकेट, १२० एमएम मोटर, ईएलएम रडार, लोरो रडार, स्वाती रडार आदींची प्रात्यक्षिके सादर केली.

यावेळी तोफांचा दणाणणारा आवाज, त्यातून उडणारे तोफ गोळे, निर्धारित लक्ष गाठल्याने उपस्थितांकडून सैनिकांचे कौतूक करणार्‍या टाळ्याच्या गजरातून उभयतांचा अनोखा संवाद पहायला मिळाला. तसेच हेलिकॅप्टरची भूमी लगतची उड्डाण, पॅराशुटने निर्धारित जागेवर उतरणारे चार जवान यामुळे भारतीय संरक्षण दलाच्या समर्पणाबद्दल प्रत्येकजण नतमस्तक होत होता.

तर गेल्या नोव्हेंबर महिन्यात लष्करात (Army) दाखल झालेल्या वज्र आणि होवेत्झर या दोन तोफांचे ‘तोपची २०२३’ मध्ये प्रथमच सहभागी करण्यात आले. लष्कराचे रणगाडे, रॉकेट्स, मिसाईल लक्ष्य प्राप्ती रडार, मनुष्य रहित विमान यांच्यासह लष्कराच्या हायटेक ताकतीचे दर्शन घडले.

याशिवाय अत्याधुनिक अल्ट्रा लाईट होवित्झर एम-७७७, स्वयंचलित के ९ वज्र यासोबतच लढाऊ हेलिकॉप्टर चेतक आणि चिता यांनीही उपस्थितांची मने जिंकली. तर सर्वप्रथम अधिकारी श्रीनाथ यांनी निर्धारित स्थळांची माहीती दिली. तसेच तोफगोळ्यांची व रणगाड्यांच्या इतिहाचा उल्लेख करणारे समालोचन लाजबाब होते.

आधुनिक कोड आर्टीकल सिस्टीम गन लवकरच

‘तोपची’ च्या माध्यमातून रिजमेंट ऑफ आर्टीलरीच्या क्षमता दिसून आल्या. गन उभारताना आत्मनिर्भयतेवर विशेष लक्ष दिले आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत के-९ वज्र दाखल होणार आहे. त्याहूनही मोठी गन ८७७ युएलएचही पूर्णत: भारतात बनवली जाते. तसेच ५२ किमीवर मार करणारी ‘धनुष्य गन’ लवकरच दाखल होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या