Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यामोठी बातमी! लष्कराचं चित्ता हेलिकॉप्टर कोसळलं; दोन्ही पायलट बेपत्ता

मोठी बातमी! लष्कराचं चित्ता हेलिकॉप्टर कोसळलं; दोन्ही पायलट बेपत्ता

नवी दिल्ली | New Delhi

अरुणाचल प्रदेशमध्ये (Arunachal Pradesh) लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर कोसळल्याने (Cheetah Helicopter Crashed) मोठी दुर्घटना घडली आहे. तसेच हेलिकॉप्टरमधील दोन्ही लष्करी पायलट बेपत्ता झाले आहेत…

- Advertisement -

अमृता फडणवीसांना १ कोटींची लाच ऑफर; डिझायनरविरोधात तक्रार; काय आहे प्रकरण?

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर मिसामारीच्या दिशेने निघाले होते. मात्र, हेलिकॉप्टर मध्येच कोसळले. त्यावेळी हेलिकॉप्टरमध्ये पायलट आणि को-पायलट होते. तसेच हेलिकॉप्टरच्या अपघाताचे (Accident) कारण अद्याप समजू शकलेले नाही.

तर गुवाहटीचे जनसंपर्क अधिकारी लेफ्टनंट कर्नल महेंद्र रावत (Lt. Col. Mahendra Rawat) यांनी सांगितले की, ऑपरेशन सॉर्टीसाठी चित्ता हेलिकॉप्टरने उड्डाण केले होते. पंरतु, सकाळी ९.१५ वाजेच्या सुमारास एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) शी हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला. तसेच घटनास्थळी शोधकार्य सुरू आहे.

नाशिक-मुंबई महामार्गावरून जाताय? आधी ही बातमी वाचा

दरम्यान, याआधी ऑक्टोबर महिन्यात अरुणाचल प्रदेशमधील तवांग (Tawang) जवळ भारतीय लष्कराच्या चित्ता हेलिकॉप्टरचा अपघात झाला होता. त्यावेळी या अपघातात पायलटचा मृत्यू (Death) झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा अरुणाचल प्रदेशमध्ये चित्ता हेलिकॉप्टर कोसळले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या