भारतातील नवीन लस Zydus Cadila , इंजेक्शनची गरज नसणार, मुलांसाठी चालणार का?

फार्माजेट तंत्राचा वापर करुन शरीरात दिले जाणार औषध
भारतातील नवीन लस Zydus Cadila , इंजेक्शनची गरज नसणार, मुलांसाठी चालणार का?

नवी दिल्ली-

कोरोनाविरोधातील लढ्यात भारताच्या खात्यात आणखी एक शस्त्र पडणार आहे. बंगळुरुमधील झायडस कॅडिला (Zydus Cadila) कंपनीने ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया म्हणजे डीसीजीआयला (DCGI) १२ वर्ष आणि त्यापुढील मुलांवरील आपल्या ZyCoV-D लशीच्या आपात्कालीन वापराच्या मंजुरीसाठी परवानगी मागितली आहे. ही पहिली पालस्मिड DNA लस आहे. तसेच विना इंजेक्शनने (सुई नसणार) फार्माजेट तंत्राचा वापर करुन ही लस दिली जाणार आहे.

भारतातील नवीन लस Zydus Cadila , इंजेक्शनची गरज नसणार, मुलांसाठी चालणार का?
नव्या-कोऱ्या सीएनजी बसमधून नाशिककरांची पहिली सफर; नऊ बसेसची फ्री ट्रायल यशस्वी

आता डीसीजीआयने (DCGI) परवानगी दिल्यास भारताला आणखी एक लस मिळू शकते. झायडस कॅडिलाच्या (Zydus Cadila) तिसऱ्या टप्प्यातील चाचणी पुर्ण झाली आहे. त्यात २८ हजार जणांवर चाचणी झाली. डीएनएवर आधारित असणाऱ्या या लशीच्या तिन्ही टप्प्यातील चाचण्या पार पडल्या आहेत. झायडस कॅडेलाने डीसीजीआयला (DCGI) निवदेन दिले आहे. ज्यात डीएनए लस Zycov-D च्या आपात्कालीन वापरासाठी मंजुरी मागितली आहे. कंपनीने तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचा डेटा सादर केला आहे

डेटानुसार, Zycov-D ची लस १२ ते १८ वर्षांमधील मुलांसाठी प्रभावी आहे. कंपनीने दरवर्षी १० ते १२ कोटी लस निर्माण करण्याची तयारी केली आहे. कोविड वर्किंग ग्रुपचे अध्यक्ष डॉ. एनके अरोडा यांनी सांगितलं की, झायडस कॅडिलाच्या लशीची चाचणी जवळपास पूर्ण झाली आहे. जुलैच्या शेवटापर्यंत किंवा ऑगस्ट महिन्यात १२ ते १८ वर्षांमधील लहान मुलांना कोरोना प्रतिबंधक लस मिळण्यास सुरु होईल.

काय आहे फार्माजेट तंत्र

झायडस कॅडिला ZyCoV-D कोरोना व्हॅक्सीन १२ से १८ वर्ष वयाच्या मुलांसाठी सुरक्षित आहे. ही फार्माजेट म्हणजेच सुई विरहीत (PharmaJet needle free applicator) च्या मदतीने दिली जाणार आहे. या प्रकरात सुई नसणाऱ्या इंजेक्शनमध्ये औषध भरली जाते. त्यानंतर त्याला मशीन लावून ती हातावर लावली जाते. मशीनवरील बटन क्लिक करुन औषध शरीरात टाकले जाते.

दरम्यान, भारतात आतापर्यंत चार लशींच्या वापराला परवानगी मिळाली आहे. यात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोविशिल्ड, भारत बायोटेकची कोवॅक्सिन, रशियाची स्पुटनिक ५ आणि अमेरिकीची मॉडर्ना या लशींचा समावेश आहे. झायडस कॅडिलाच्या लशीला आपत्कालीन वापरास परवानगी मिळाल्यास ती पाचवी लस ठरु शकते. शिवाय यामुळे लसीकरणाच्या मोहिमेला गती मिळू शकते. भारतात आतापर्यंत ३३ कोटींपेक्षा अधिक लोकांना कोरोना प्रतिबंधक लशीचा किमान एक डोस मिळाला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com