Thomas Cup 2022 : चक दे इंडिया! भारताने पहिल्यांदाच पटकावला 'थॉमस कप'

७३ वर्षांनी जिंकले सुवर्णपदक
Thomas Cup 2022 : चक दे इंडिया! भारताने पहिल्यांदाच पटकावला 'थॉमस कप'

बँकॉक | Bangkok

थॉमस कप बॅडमिंटन 2022 चा (Thomas Cup Badminton 2022) अंतिम सामना भारताने जिंकून एक नवा इतिहास रचला आहे. ७३ वर्षांनी भारताने या कपवर आपले नाव कोरले आहे. या सामन्यात भारतासमोर इंडोनेशियाचा (Indonesia) पराभव केला आहे. किदाम्बी श्रीकांतने जोनातन क्रिस्टीचा पराभव करत सरळ 3-0 ने सामना जिंकला आहे....

पहिल्या सामन्यात लक्ष्य सेनने इंडोनेशियाच्या अँथनी सिनिसुकाचा 8-21, 21-17, 21-16 असा पराभव केला. दुसऱ्या दुहेरीत सात्विक साईराज रँकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने 18-21, 23-21, 21-19 असा विजय मिळवला. तिसरा सामना पुन्हा एकेरीचा होता. ज्यात किदाम्बी श्रीकांतने जोनाथन क्रिस्टीचा 21-15, 23-21 असा सरळ पराभव करत थॉमस कपवर पहिल्यांदा भारताचे नाव कोरले.

या स्पर्धेत इंडोनेशिया संघ एकही सामना हरला नव्हता. तर भारतीय संघाला ग्रुप स्टेजमध्ये चायनीज तैपेईविरुद्ध एकमेव पराभव पत्करावा लागला होता. मात्र आता भारताने अंतिम फेरीत इंडोनेशियाचा पराभव करून पहिल्यांदाच 'थॉमस कप' पटकावला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com