
मुंबई | Mumbai
भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील ३ सामन्यांच्या टी २० मालिकेनंतर आजपासून दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांच्या मालिकेला (Series) सुरुवात होणार आहे. त्यातील पहिला वनडे सामना बरसपरा स्टेडियमवर (Baraspara Stadium) दुपारी दीड वाजता खेळविण्यात येणार आहे...
वनडे मालिकेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे ( Rohit Sharma)असून हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. भारतात ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असून त्यादृष्टीने विजयी ट्रॅकवर परतण्यासाठी भारतासाठी ही मालिका महत्वाची असणार आहे.
आजच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर हे खेळणार आहेत. तर सलामीवीर शिखर धवनला संघातून खराब कामगिरीमुळे बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला असून भारताच्या डावाची सुरुवात ईशान किशन किंवा शुभमन गिल करण्याची शक्यता आहे.
दरम्यान, दुसरीकडे टी २० मालिकेतील पराभव मागे सारून वनडे मालिकेत विजयी सुरुवात करण्यासाठी दसून शनकाचा (Dasun Shanka) नेतृत्त्वात श्रीलंका मैदानात उतरणार आहे. तसेच भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषक स्पर्धेचा विचार करता दोन्ही संघांसाठी मालिका महत्वाची आहे.
सलील परांजपे, नाशिक