
मुंबई | Mumbai
भारत आणि श्रीलंका (India VS Sri Lanka) यांच्यातील ३ सामन्यांच्या टी २० मालिकेतील अखेरचा टी २० सामना आज राजकोट (Rajkot) येथील सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर (Saurashtra Cricket Stadium) खेळविण्यात येणार असून सायंकाळी ७ वाजता सुरु होईल...
दुसऱ्या सामन्यातील पराभवाचा वचपा काढण्यासाठी भारतीय संघ (Indian team) कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. तर दुसऱ्या सामन्यातील विजयामुळे श्रीलंकेचा आत्मविश्वास वाढला असून आपली विजयी घोडदौड कायम राखण्यासाठी ते देखील सज्ज झाले आहेत. त्यामुळे मालिकेत चांगलीच रंगत निर्माण झाली आहे.
दरम्यान, आजपर्यंत राजकोट येथील मैदानावर ४ सामने झाले असून त्यापैकी भारताला ३ सामन्यात विजय तर एका सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे.
सलिल परांजपे, नाशिक