भारत विरुध्द पाकिस्तान आज सुपर फोरसाठी पुन्हा भिडणार

भारत विरुध्द पाकिस्तान आज सुपर फोरसाठी पुन्हा भिडणार

कोलंबो | Colombo

सुपर इलेव्हन आशिया चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये (Asia Cup Cricket League) आज भारत आणि पाकिस्तान (India Vs Pakistan) पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहेत. हा सामना कोलंबो येथील आर के प्रेमदासा स्टेडियमवर (RK Premdasa Stadium) भारतीय वेळेनुसार दुपारी ३:०० वाजता खेळला येणार आहे.

हा सामना भारतीय संघासाठी अतिशय महत्त्वाचा असणाऱ असून सुपर ४ मधील सलामी सामन्यात विजय संपादन करून अंतिम सामन्याच्या शर्यतीमध्ये आपले स्थान अधिक मजबूत करण्यासाठी भारत मैदानात उतरणार आहे.

पाकिस्तान संघाने सलामीच्या सुपरफोर लढतीमध्ये बांगलादेश संघावर विजय संपादन करून अंतिम सामन्याच्या तिकिटासाठी आपला दावा मजबूत केला आहे. या सामन्यात पाकिस्तान संघाचे कर्णधारपद बाबर आझम सांभाळणार आहे. तर भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे असणार आहे.

अखेरच्या नेपाळ विरुद्ध सामन्यातील विजयाने भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावला असल्याे पाकिस्तान संघाला अंतिम सांगण्याचा तिकिटापासून रोखण्याची चांगली संधी भारतीय संघाकडे असणार आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यावर ८० टक्के पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पुन्हा एकदा रद्द होणार का? असा प्रश्न सर्व क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. दोन्ही संघांची तुलना केल्यास फलंदाजी, गोलंदाजी यांचा समतोल असलेल्या पाकिस्तान संघाला रोखण्यासाठी भारतीय क्रिकेट संघाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल.

सलिल परांजपे नाशिक

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

Related Stories

No stories found.
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com