IND vs NZ 3rd T20 : भारताला मालिका विजयाची संधी

IND vs NZ 3rd T20 : भारताला मालिका विजयाची संधी

मुंबई | Mumbai

भारत आणि न्यूझीलंड (India VS New Zealand) यांच्यात ३ टी २० सामन्यांची मालिका सुरु असून मालिकेत भारताने १-० ने आघाडी घेतली आहे. त्यानंतर आज तिसरा टी २० सामना नेपियर (Napier) येथे खेळविण्यात येणार असून भारतीय वेळेनुसार दुपारी १२ वाजता सुरु होईल...

आजचा सामन्यात विजय मिळवून मालिका जिंकण्यासाठी भारत (Team India) सज्ज असणार आहे.तर न्यूझीलंड मालिकेत बरोबरी साधण्यासाठी प्रयत्न करणार असून दोन्हीही संघासाठी आजचा सामना महत्वाचा असणार आहे. तसेच आजच्या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन (Kane Williamson) वैयक्तिक कारणामुळे खेळू शकणार नाही. त्यामुळे संघाचे नेतृत्त्व टीम साऊथीकडे (Team Southee) असणार आहे.

दरम्यान, केन विलियम्सनच्या जागेवर बदली खेळाडू म्हणून मार्क चॅपमनला (Mark Chapman)संधी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे आजच्या सामन्यावर पावसाचे (Rain) सावट देखील आहे.

सलिल परांजपे, नाशिक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com