Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशभारत-रशियात मोठा लष्करी करार

भारत-रशियात मोठा लष्करी करार

मास्को

भारताने अखेर इस्रायलकडून आणखी दोन ‘फाल्कन’ एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टिम (एवॅक्स) विकत घेण्याचा निर्णय मागील आठवड्यात घेतला. त्यानंतर आता रशियाशी AK-47 203 रायफलचा मोठा करार केला आहे.

- Advertisement -

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सध्या शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) च्या एका बैठकीसाठी रशियाला पोहचले आहेत. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांत मोठा संरक्षण करार झाला आहे. ‌त्यानुसार भारत रशियाकडून ७ लाख ७० हजार AK-47 203 रायफल घेणार आहेत. त्यातील १ लाख रशियातून आयात होणार असून ‌उर्वरित भारतात तयार होणार आहे. भारतात या ऑडरन्स फँक्टरीत तयार होणार आहे.

राजनाथसिंह बुधवारी सायंकाळी मॉस्कोत दाखल झाले. गुरुवारी होणाऱ्या रशियन समकक्ष जनरल सर्गेई शॉयगू यांच्यासोबत बैठकीस ते ‌‌उपस्थित राहणार आहे

भारताने इस्रायलकडून दोन एवॅक्स विकत घेण्याचा निर्णय मागील आठवड्यात घेतला होता. इस्रायली एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टिम रशियन बनावटीच्या इल्यूसीन-७६ विमानावर बसवण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या