जुन्या कोरोना मृतांच्या नोंदीमुळे राज्यात विक्रमी ६६१ जणांचा मृत्यू

बिहारमध्ये एका दिवसांत दाखवले तब्बल ३९५१ मृत्यू
जुन्या कोरोना मृतांच्या नोंदीमुळे राज्यात विक्रमी ६६१ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली

देशात बुधवारी तब्बल ६ हजार १४८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. एका दिवसांत आतापर्यंत झालेले हे सर्वाधिक मृत्यू होते. तसेच जगात एका दिवसांत सर्वाधिक मृत्यू भारतात झाले. यापुर्वी भारतात सर्वाधिक मृत्यू १८ मे २०२१ रोजी झाले होते. त्यावेळी ४ हजार ५२९ मृत्यूची नोंद झाली होती. परंतु खरंच हे एका दिवसातील मृत्यू आहेत का?

जुन्या कोरोना मृतांच्या नोंदीमुळे राज्यात विक्रमी ६६१ जणांचा मृत्यू
नाशकात करोनाबाधित घटले मात्र आठ दिवसांत पावणेदोनशे मृत्यू

देशातील अनेक राज्यांत मृतांची आकडेवारी लपवण्यात आली होती. यामुळे आता ही संख्या दुरुस्त केली जात आहे. बिहारमध्येही मृतांची संख्या दुरुस्त केले जात आहे. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रत्यय अमृत यांनी ३९५१ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. यातील अनेक जणांचा मृत्यू काही आठवड्यांपुर्वी किंवा कोरोनाच्या पहिल्या लाटे दरम्यान झाल्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात मृतांच्या संख्येत दुरुस्ती

महाराष्ट्र मे २०२० पासून मृतांची संख्या दुरुस्त केली जात आहे. १५ ते ३० दिवसांत जुने मृत्यू जोडले जात आहे. बुधवारी राज्यात ६६१ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यातील ४०० मृत्यू मागील आहेत, ते अहवालात आले नव्हते. ‌उर्वरित २६१ पैकी १७० जणांचा मृत्यू मागील ४८ तासांत झाला होते. तर ९१ मृत्यू मागील आठवड्यातील आहे.

यापुर्वी राज्याच्या अहवालात १६ मे २०२० रोजी १४०९ जणांचा मृत्यू दाखवण्यात आला होता. त्यातील ८१ मृत्यू १६ मे चे होते. ‌उर्वरित १३२८ जणांचा मृत्यू यापुर्वी अहवालात न आल्यामुळे त्यांचा समावेश केला गेला. राज्यात २७ मे रोजी ४२५ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद होती. त्यातील १५८ मृत्यू जुने होते. २६७ जणांचा मृत्यू २७ मेच्या मागील ४८ तासांतील होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com