शंभर कोटी डोसचा टप्पा उद्या होणार पूर्ण; हा क्षण असा साजरा होणार

शंभर कोटी डोसचा टप्पा उद्या होणार पूर्ण; हा क्षण असा साजरा होणार

नवी दिल्ली

देशभरात राबविल्या जात असलेल्या कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण (vaccination)मोहिमेतंर्गत पात्र लाभार्थ्यांना लसीचे ९९ कोटी ५५ लाखांपैक्षा जास्त डोस देण्यात आले आहे. आता गुरुवारी, २१ ऑक्टोबर रोजी भारत एक अब्ज डोसचा (100 crore) टप्पा पार करणार आहे. एका ऐतिहासिक क्षण मोठ्याप्रमाणावर साजरा करण्याचा मोदी सरकारचा बेत आहे.

CoWin वेबसाइटवर १०० कोटी डोस पूर्ण करण्यासाठी काउंटडाउन दिसेल. हे काउंटडाउन #VaccineCentury या नावाने दिसेल

थीम साँग लाँच करणार

देशातील लसीकरणाच्या 100 कोटी डोसचा टप्पा ओलांडल्यानंतर त्याचं यश साजरं करण्यासाठी केंद्र सरकारने जय्यत तयारी सुरु केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून कैलाश खेर यांच्या आवाजात एक थीम सॉंग लाँच केलं जाणार आहे. लसीकरणाने 100 कोटींचा आकडा ओलांडताच हे थीम साँग देशभरातील सार्वजनिक ठिकाणी जसं की रेल्वे स्टेशन, मेट्रो स्टेशन, विमानतळ, बस स्टँडवर ऐकायला मिळणार आहे. याशिवाय समुद्र किनारे आणि जहाजांवर या यशस्वी टप्प्याचं (Milestone) सेलेब्रेशन केलं जाणार आहे.

शंभर कोटी डोसचा टप्पा उद्या होणार पूर्ण; हा क्षण असा साजरा होणार
आता वाजवा फटाके : उत्तर महाराष्ट्रातील बंदीचा निर्णय मागे

असा आहे टप्पा

  • 16 जानेवारीला कोरोना लसीकरणा सुरुवात

  • 1 फेब्रुवारीला एक कोटी डोस पुर्ण.

  • 15 जून रोजी 25 कोटी डोस पूर्ण

  • 6 ऑगस्ट रोजी 50 कोटी डोस पूर्ण

  • 13 सप्टेंबरला 75 कोटी लसींचा टप्पा पूर्ण

  • आता शंभर कोटी

शंभर कोटी डोसचा टप्पा उद्या होणार पूर्ण; हा क्षण असा साजरा होणार
शाहरुखने म्हटले होते, मुलाने ड्रग्स घ्यावे, डेटींग करावी अन...

Related Stories

No stories found.