सर्वाधिक चाचण्याच्या यादीत भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर

नवी दिल्ली

देशात सध्या करोनाच्या चाचण्यांची संख्याही वाढवण्यात आली आहे. देशातील पाच राज्यांमध्ये अ‍ॅक्टिव्ह केसेसची संख्या अधिक आहे.

Coronavirus in India देशातील करोनाच्या संक्रमणासंदर्भात माहिती देण्यासाठी (Coronavirus) केंद्रीय आरोग्य मंत्रालयची पत्रकार परिषद झाली. आरोग्य सचिव राजेश भूषण (Rajesh Bhusan), सहसचिव लव अग्रवाल, ICMR चे डीजी डॉ. बलराम भार्गव ‌उपस्थित हाेते. राजेश भूषण यांनी सांगितले की, भारत जगातील सर्वात जास्त करणारा देशांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. देशात ४ कोटी ५५ लाखांपेक्षा अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. गेल्या २४ तासांमध्ये ११ लाख ७२ हजार चाचण्या करण्यात आल्या. २४ तासांत झालेल्या चाचण्यांचा हा विक्रम आहे.

पाच राज्यांत सर्वाधिक केसेस

महाराष्ट्रासह तामिळनाडू, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश मिळून एकूण अ‍ॅक्टिव्ह केसेसच्या ६२ टक्के केसेस आहेत. तसेच आंध्र प्रदेश, दिल्ली, कर्नाटक, तामिळनाडू आणि महाराष्ट्रात या राज्यांमध्येच एकूण मृत्यूंच्या ७० टक्के मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आठवड्याच्या संख्येच्या आधारावर गेल्या तीन आठवड्यांमध्ये महाराष्ट्रातील अ‍ॅक्टिव्ह केसेसमध्ये ७ टक्क्यांची घट झाली आहे.आतापर्यंत करोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्याही वाढून २९ लाख ७० हजारांवर पोहोचली आहे.

नवीन ८३ हजार रुग्ण

मागील २४ तासांत देशा ८३ हजार ८८३ नवीन रुग्ण आढळले आहेत. देशात आता करोना चाचण्या वाढवण्यावर भर दिला जात आहे. २ सप्टेंबरपर्यंत ४ कोटी ५५ लाख ९ हजार ३६० चाचण्या झाल्या आहेत.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *