भारत-चीन प्रश्न चर्चेने न सुटल्यास हा पर्याय

संरक्षण प्रमुख जनरल बिपिन रावत यांचे मोठे वक्तव्य
बिपिन रावत
बिपिन रावत

नवी दिल्ली

भारत-चीन सीमा प्रश्न चर्चेने सोडवण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि राष्ट्रीय सुरक्षेची जबाबदारी असलेले लोक सर्वच पर्यायांवर विचार करत आहेत, असे देशाचे संरक्षण प्रमुख जनरल बिपिन रावत (CDS General Bipin Rawat) यांनी सांगितले.

दोन्ही देशांमधील लडाखचा प्रश्न शांततेच्या मार्गानेच सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. जर चर्चेने प्रश्न न सुटल्यास सैन्य कारवाईच्या पर्यायाचा विचार सुरू आहे, असे बिपिन रावत यांनी म्हटले आहे. पूर्व लडाखमध्ये सैन्यदलाची पूर्ण तयारी असल्याचे रावत यांनी म्हटले आहे. भारत-चीनदरम्यानची चर्चा अयशस्वी झाली, तर या पर्यायावर विचार केला जाणार आहे, असे रावत म्हणाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com